Sushant Singh Rajput Case: मुंबई उच्च न्यायालयाने रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती आणि इतरांच्या जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला
रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती आणि मुंबई पुलिस (Photo Credits: Facebook)

Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंग राजपूत प्रकरणी (Sushant Singh Rajput) ड्रग्स अँगलचा तपास करणार्‍या एनसीबीने रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि शोविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) यांना अटक केली आहे. त्यानंतर रिया आणि तिचा भाऊ शोविकने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली. मात्र, रियाच्या जामिन याचिकेवर आज सुनावणी सुरू असताना मुंबई उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. रिया आणि शोविक यांच्या जामीन अर्जावर 23 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. परंतु, पावसामुळे ही सुनावणी तहकूब करण्यात आली होती. आज झालेल्या सुनावणीदरम्यान, एनसीबीने रिया आणि शोविकच्या जामिनाला विरोध केला. एनसीबीच्या मते, रिया आणि शोविक दोघे बाहेर आले तर त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो. रिया ही ड्रग्सच्या खरेदी आणि वित्तपुरवठ्यात सहभागी होती, अशी माहितीदेखील यावेली एनसीबीने न्यायालयासमोर दिली. (हेही वाचा - Bigg Boss 14: 'बिग बॉस 14' मध्ये येण्याआधीच स्पर्धक गोपी बहु म्हणजेच Giaa Manek ला निर्मात्यांनी दाखवला बाहेरचा रस्ता, त्याऐवजी दिसणार 'हे' दोन सेलेब्ज; जाणून घ्या काय आहे कारण)

सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर सुशांतने आत्महत्या केली नसून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सुशांतच्या वडिलांनी केली होती.

त्यानंतर आता सीबीआय चौकशीत सुशांतच्या ड्रग्ज एंगलचा तपास करण्यात येत आहे. या तपासात रिया चक्रवर्तीने सुशांतला ड्रग्जचा पुरवठा केला असल्याचं समोर आलं. त्यानंतर रिया आणि तिचा भाऊ शोविकला अटक करण्यात आली होती. दरम्यान, रियाने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, न्यायालयाने जामिनावरील निर्णय रोखून ठेवला आहे.