Mahesh Manjrekar Extortion Call Case: अंडरवर्ल्ड डॉन आबू सालेम याच्या नावाखाली महेश मांजरेकर यांना धमकावत 35 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा निघाला ठाणे येथील चहावाला

अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील एका चहावाल्याला अटक केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम टोळीचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीने मांजरेकर यांच्याकडे तब्बल 35 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. लॉकडाऊनमुळे हाती काम नसल्यामुळे पैसे कसे मिळवायचे म्हणून त्याने इंटरनेटवर युट्यूबचा आसरा घेतला होता. युट्युब सर्च करता करता त्याला झटपट पैसे मिळवण्यासाठी त्याच्या डोक्यात खंडणीची कल्पना सुचली. दरम्यान, त्याने युट्युबच्या आधारे अबू सालेमची माहिती गोळा केली. त्यानंतर त्याने महेश मांजरेकर यांना कॉलसह काही मॅसेज पाठवले होते. मात्र, अटकेच्या भितीने पळून गेलेला मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने खंडणीखोराचा शोध घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

महेश मांजरेकर यांना 26 ऑगस्ट रोजी खंडणीचा फोन आला होता. याप्रकरणी महेश मांजरेकर यांनी दादर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून खंडणीविरोधी पथकाने तपासाला सुरूवात केली. अखेर मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने खंडणीखोराचा शोध घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच त्याच्याकडून गुन्ह्यांतील मोबाईलसह दोन सिमकार्ड पोलिसांनी हस्तगत केली आहेत. हे देखील वाचा- Sadak 2 Song Shukriya: सड़क 2 सिनेमातील 'शुक्रिया' गाणे रसिकांच्या भेटीला; हळूवार गाण्यात दिसली आलिया भट्ट-आदित्य रॉय कपूर यांची केमिस्ट्री

आयएएनएसचे ट्विट- 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला गुरुवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी कोर्टाने त्यालाल 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. महत्वाचे म्हणजे, आरोपी आणि आबू सालेम यांचा काहीही संबंध नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.