संजय दत्त (Sanjay Dutt), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) यांचा सड़क 2 (Sadak 2) सिनेमा 28 ऑगस्ट रोजी डिजनी प्लस हॉट स्टारवर (Disney Plus Hotstar) प्रदर्शित होणार आहे. दरम्यान सिनेमाचे नवे गाणे आज रसिकांच्या भेटीला आले आहे. 'शुक्रिया' (Shukriya) गाण्यात आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. संजय दत्त आणि पूजा भट्ट (Pooja Bhatt) यांच्या 'सड़क' सिनेमाचा हा सिक्वल असून या सिनेमातून पुन्हा एकदा महेश भट्ट (Mahesh Bhatt) दिग्दर्शकाची भूमिका बजावणार आहेत. (Sadak 2 Trailer: संजय दत्त, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर स्टारर 'सड़क 2' सिनेमाचा ट्रेलर आऊट, Watch Video)
केके आणि जुबीन नौटियाल यांनी हे गाणे गायले असून जीत गांगुली यांनी संगीतबद्ध केले आहे. रश्मी विराग हिने हे गाणे लिहिले आहे. या गाण्यात आलिया भट्ट, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर आपल्याला भावूक झालेले पाहायला मिळत आहेत. (संजय दत्त च्या आगामी 'सडक 2' चित्रपटामधील नवे गाणे प्रदर्शित; प्रत्येक प्रियकराच्या हृदयाला स्पर्शून जाईल असे हे गाणे)
पहा व्हिडिओ:
'सड़क 2' सिनेमावर प्रेक्षक नाराज असून सोशल मीडियावर ट्रोल करुन ते आपली नाराजी व्यक्त करत आहेत. सिनेमाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांच्या नाराजीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे सर्वाधिक डिसलाईक्स मिळालेल्या ट्रेलरमध्ये या सिनेमाच्या ट्रेलरची गणती करण्यात येत आहे. तसंच हा सिनेमा म्हणजे नेपोटिज्मचे प्रॉडक्ट अशीही टिका यावर होत आहे.