Sadak 2 Song Dil Ki Purani: संजय दत्त च्या आगामी 'सडक 2' चित्रपटामधील नवे गाणे प्रदर्शित; प्रत्येक प्रियकराच्या हृदयाला स्पर्शून जाईल असे हे गाणे
या गाण्याच्या व्हिडिओमध्ये संजय दत्त आणू पूजा भट्ट यांच्या जुन्या सडक चित्रपटातील अनेक सीन्ससह सध्याच्या काळातील संजय दत्त दिसत आहे. या गण्यात संजू बाबा आपल्याला सोडून गेलेल्या प्रेयसीच्या दु:खात बुडालेला दिसत आहे
Sadak 2 Song Dil Ki Purani Sadak: संजय दत्त (Sanjay Bhatt) आणि पूजा भट्ट (Pooja Bhatt) यांचा 90 च्या दशकात गाजलेला चित्रपट सडक चा पार्ट 2 (Sadak 2) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेपोटिजमच्या मुद्द्यावरुन वादाच्या भोव-यात अडकलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नुकतेच या चित्रपटातील 'दिल की पुरानी सडक' (Dil Ki Purani Sadak) हे गाणे प्रदर्शित झाले आहे. प्रेमवीरांच्या काळजाला हात घालेल असे या गाण्याचे बोल आहेत. या चित्रपटात संजय दत्त सह आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) देखील प्रमुख भूमिकेत दिसतील.
या गाण्याच्या व्हिडिओमध्ये संजय दत्त आणू पूजा भट्ट यांच्या जुन्या सडक चित्रपटातील अनेक सीन्ससह सध्याच्या काळातील संजय दत्त दिसत आहे. या गण्यात संजू बाबा आपल्याला सोडून गेलेल्या प्रेयसीच्या दु:खात बुडालेला दिसत आहे. Sadak 2 Most Disliked YouTube Video: आलिया भट्ट, संजय दत्त यांच्या 'सडक 2' च्या ट्रेलरचा नवा विक्रम; ठरला भारतामधील सर्वाधिक नापसंत व्हिडिओ, जाणून घ्या काय म्हणाली पूजा भट्ट
या गाण्याला गायक केके ने आवाज दिला असून विजय विजावत यांनी हे गाणे लिहिले आहे. तर समिव्द मुखर्जी आणि उर्वीने या गाण्याचे बोल लिहिले आहेत.
महेश भट्ट दिग्दर्शित सडक 2 हा चित्रपट येत्या 28 ऑगस्टला डिज्नी प्लस हॉट स्टारवर झळकणार आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे हा चित्रपट OTT प्लेटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 24, 2020 04:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

