Sadak 2 Trailer: संजय दत्त, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर स्टारर 'सड़क 2' सिनेमाचा ट्रेलर आऊट (Watch Video)
Sadak 2 Trailer (Photo Credits: YouTube)

'कलंक' (Kalank) सिनेमानंतर संजय दत्त (Sanjay Dutt), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) हे त्रिकूट पुन्हा एका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार झाले आहे. महेश भट्ट दिग्दर्शित 'सड़क 2' (Sadak 2) सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून ट्रेंडमध्ये आहे. आलिया भट्ट हिने हा ट्रेलर ट्विटरवर शेअर करत लिहिले की, "तीन दिशा, तीन कथा आणि एक प्रवास, पहा 'सड़क 2' चा ट्रेलर." (आलिया भट आणि संजय दत्त चा 'सडक 2' चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; ट्विटरवर युजर्स करतायत #BoycottSadak2 ला ट्रेंड)

ट्रेलरच्या सुरुवातीला 'सड़क' (1991) सिनेमातील रस्त्यांचे काही दृश्यं पाहायला मिळतात. तर 'सड़क 2 या सीक्वलमध्ये संजय दत्त आणि पूजा भट्ट यांची पुढील गोष्ट पाहायला मिळणार आहे. तर आदित्य रॉय कपूर आणि आलिया भट्ट ही नवी जोडी सिनेमात सादर होणार आहे.

Alia Bhatt Tweet:

पहा सिनेमाचा ट्रेलर:

रोमान्स, ड्रामा, रोमांच आणि गुढता यांचे मिश्रण ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तब्बल 20 वर्षांनंतर महेश भट्ट दिग्दर्शन करत आहेत. सिनेमात मकरंद देशपांडे, जीशु सेनगुप्ता आणि गुलशन ग्रोवर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा 28 ऑगस्ट, 2020 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार व्हिआयपी अॅप वर रिलीज करण्यात येईल.