Mr. Lele Poster Out: वरुण धवन ने शेअर केला त्याच्या नव्या चित्रपटातील Almost Naked लुक

Mr. Lele Poster Out: हे वर्ष बॉलीवूडसाठी खूपच खास असणार असल्याचे दिसत आहे. तान्हाजी आणि छपाक या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कामगिरी केल्यावर, वरुण धवनच्या नव्या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. निर्माता शशांक खेतान आणि वरुण धवन यांची हिट जोडी पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. मिस्टर लेले हे शीर्षक असलेल्या या नव्या विनोदी चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. वरुणने त्याच्या सोशल मीडियावर हा पोस्टर शेअर केला आहे ज्यामध्ये तो एका कॉमेडी लुक मध्ये दिसत आहे.

पोस्टरबद्दल बोलायचं झालं तर, यात वरुण धवन शर्टलेस आणि पॅन्टलेस (बॉक्सरमध्ये) दिसत आहे. त्याचे दोन्ही हात वर असून, त्याच्या एका हातात बंदूक दिसते तर दुसऱ्या हातात वरुणने एक घड्याळ घातले आहे. या पोस्टरकडे बघून आपल्याला जाणवते की वरुण एका दरोडेखोराची भूमिका साकारत आहे ज्याला पोलिसांनी पकडले असावे. पुढील वर्षी 1 जानेवारी 2021 रोजी हा चित्रपट सिल्व्हरस्क्रीनवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

काही दिवसांपासून, या चित्रपटात कोणती अभिनेत्री दिसणार आहे याबद्दल बर्‍याच चर्चा दिसत होत्या. अभिनेत्री कियारा अडवाणी हिचं नाव आघाडीवर होतं परंतु, नंतर व्यस्त वेळापत्रकांमुळे कियाराने हा चित्रपट सोडल्याचे बोललं जात आहे.

Sakshi Chopra Sexy Photo: साक्षी चोपडाचा बिकिनीमधील Hot अवतार; वक्षस्थळांचे दर्शन घडवून दिला चाहत्यांना धक्का (Photo)

आता बघायला गेलं तर चित्रपटात वरुण धवन आणि भूमी पेडणेकर पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसू शकतील. या दोघांसोबतच जाह्नवी कपूरसुद्धा या चित्रपटात दिसू शकते असं बोललं जातंय.