सध्या नेटफ्लिक्सवर वेबसिरिजच्या माध्यमातून विविध घटनांवर आधारित नव्या कथा पाहायला मिळतात. त्यामुळे आता 'मोगली' सुद्धा नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर येत्या 25 नोव्हेंबरला 'मोगली : दी लेजंड ऑफ जंगल' हिंदी माध्यमातून पाहायला मिळणार आहे.
नेटफ्लिक्सचा नवा चित्रपट मोगली लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूड कलाकार करिना कपूर, अभिषेक बच्चन आणि अनिल कपूर हे यामध्ये त्यातील पात्रांना आवाज देणार आहेत. तर माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफसुद्धा यांचा ही सहभाग असणार आहे.
View this post on Instagram
The voices of the jungle are calling. Mowgli: Legend of the Jungle on Netflix December 7.
तसेच मोगलीचा मित्र बगीरा म्हणजेच ब्लॅक पँथरला अभिनेता अभिषेक बच्चन आवाज देणार आहे. तर 'बालू' भूमिकेच्या पात्राला अनिल कपूर, 'शेर खान' या पात्राला जॅकी श्रॉफ आवाज देणार आहेत. मात्र करिना आणि माधुरी या चित्रपटातील कोणत्या पात्रांना आवाज देणार असल्याचे अद्याप सांगण्यात आलेले नाही आहे.