सपना चौधरी म्हणतेय 'Mood Bana Lo', चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला (Video)
अभिनेत्री सपना चौधरी (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

हरियाणाची प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यकलाकार सपना चौधरी (Sapna Chowdhary) हिचे नुकतेच बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले आहेत. तसेच सपनाच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तर बॉलिवूडमधील सपना हिचा आगामी चित्रपट 'दोस्ती के साईड इफेक्ट' (Dosti Ke Side Effects) मधून ती पुन्हा एकदा आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणार आहे. सध्या सोशल मीडियावर सपना चौधरी हिचे 'मूड बना लो' (Mood Bana Lo) हे गाणं खुप वायरल होत असून त्याला चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद दिला जात आहे.

सपना चौधरी हिला हरियाणा मधील अनाकरली म्हणून संबोधले जाते.तर नुकतेच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक गाणं प्रदर्शित केले आहे. त्या गाण्याचे टायटल मूड बना लो असे ठेवण्यात आले आहे. हे गाणे देव नेगी, अदिती सिंह शर्मा आणि अल्ताफ सैय्यद यांनी गायले आहे. Dosti Ke Side Effetss Trailer: अभिनेत्री सपना चौधरी हिचा 'दोस्ती के साईड इफेक्ट्स' मधील बोल्ट अंदाज पाहिलात का? (Video)

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सपना चौधरी ही पोलिसांच्या वर्दीमध्ये झळकणार आहे. तसेच सपनाचे धमाकेदार फायटिंग आणि अॅक्शन सिन्स या चित्रपटातून पाहायला मिळणार आहेत.या चित्रपटाची कथा चार जीवलग मित्रांवर आधारित आहे.