khopkar | Insta

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा सध्य प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. पण त्यापूर्वीच सिनेमावरून वाद रंगला आहे. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) या सिनेमामध्ये मुख्य अभिनेत्याच्या भुमिकेत आहे. सुरूवातील दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकरांनी घेतलेला काढता पाय आणि आता कॉपिराईट्सवरून सुरू असलेला वाद यामुळे सिनेमा अडचणीत आला आहे. यावरूनच मनसेच्या चित्रपट सेनेने रणदीपला इशारा दिला आहे.

रणदीप हुडा स्क्रिप्ट मध्ये ढवळाढवळ असल्याने एकतर सिनेमामध्ये तो काम करेल किंवा मी दिग्दर्शक असेन असं महेश मांजरेकरांनी दिग्दर्शक म्हणून माघार घेतली. महेश मांजरेकरांच्या एक्झिट नंतर रणदीप स्वतः दिग्दर्शन सांभाळू लागला. पण आता त्याचे निर्मात्यांसोबत कॉपीराईट्सवरून वाद सुरू झाले आहेत.

मनसे नेते अमेय खोपकरांनी ट्विटर पोस्ट लिहून इशारा दिला आहे. 'भारतमातेला ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं अशा स्वातंत्र्यवीरांची धगधगीत गाथा मोठ्या पडद्यावर पाहण्याची मोठी उत्सुकता आहे. प्रदर्शनापूर्वी मात्र आता स्वामित्वहक्कांवरुन वाद सुरु झाला आहे, जो अतिशय दुर्दैवी आहे. हा वाद ताबडतोब थांबायला हवा, कारण यामुळे चित्रपट प्रदर्शनाला विलंब झाला तर तो खुद्द स्वातंत्र्यवीरांचा अपमान असेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न कुणीही करु नये.' असं त्यांनी पोस्ट मध्ये लिहले आहे.

पहा अमेय खोपकरांचं ट्वीट

अमेय खोपकर यांनी रणदीप हुड्डाला आणि  निर्माते आनंद पंडित यांना पत्र लिहिलं आहे. रणदीप याआधीही अनेक सिनेमांमधून रसिकांच्या भेटीला आला होता. त्याच्या कामासाठी रसिकांनी त्याला पोचपावतीही दिली आहे.