मुंबई पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेली अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आता चांगलीच अडचणीत सापडलीय. मुंबई (Mumbai) आणि मुंबई पोलिसांबाबत (Mumbai Police) केलेल्या विधानामुळे सर्वच स्तरातून तिच्यावर टिका होत असून ती चांगलीच वादाच्या भोव-यात अडकली आहे. मनसे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी देखील सोशल मिडियाच्या माध्यमातून कंगनावर टिका करुन तिला कडक शब्दांत मनसे स्टाईल दणका दिली आहे. मुंबई पोलिसांबद्दल कुणीही 'जजमेंटल' होऊन 'पंगा' घेऊ नये अशा फिल्मी स्टाईलनेच तिला सणसणीत उत्तर दिले आहे.
मनसे नेते अमेय खोपकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन बिनधास्त आपल्या घरी जातात याला कारण मुंबई पोलिस आहेत. आज मी मुंबईत सुरक्षित आहे ते केवळ मुंबई पोलिसांमुळेच. त्यांच्यावर कितीही ताण असला तरीही ते कशाचीही पर्वा न करता घट्ट पाय रोवून जनतेची सेवा करतात." Actors On Kangana Ranaut: मुंबईची पाकव्याक्त काश्मीरची तुलना करणाऱ्या कंगना रनौत हिला उर्मिला मातोंडकर, रेणूका शहाणे यांचे सणसणीत उत्तर; पहा काय म्हणाल्या (View Tweets)
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) September 4, 2020
त्यामुळे 'जर कोणाला मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर त्यांनी आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावं. याला धमकी समजा वा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल बोललेलं मीच काय पण कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही.' असेही अमेय खोपकर यांनी सांगितले आहे.
थोडक्यात सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आपल्या वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आलेली कंगनाच्या मुंबई आणि मुंबई पोलिसांच्या बेताल वक्तव्यामुळे मुंबईकरांच्या रडारवर आली आहे असे म्हणायला हरकत नाही.
याशिवाय कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर राजकीय नेते तसेच नेटीझन्सनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अशातचं काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी या प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला आहे.