Salman Khan, SP Balasubrahmanyam (Photo Credits: Instagram)

अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्यासाठी 90 च्या दशकामध्ये पार्श्वगायन करणारे प्रतिभावान गायक एस पी बालसुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांचे आज निधन झाले आहे. दरम्यान बॉलिवूडमध्ये सर्वाधिक गाणी गाण्याचा बहुमान त्यांच्या नावावर आहे. 5 ऑगस्ट पासून कोविड 19 आणि त्यानंतर कोरोनावर मात करूनही फुफ्फुसांना त्रास झाल्याने खालावत गेलेल्या प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने बालसुब्रमण्यम यांच्या आज 1 च्या सुमारास चैन्नईतील खाजगी हॉस्पिटल एमजीएम मध्ये प्राणज्योत मालवली. काल त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगण्यात आल्यानंतर अनेकांनी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केली होती. दरम्यान त्यामध्ये बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान देखील होता. मात्र चाहत्यांच्या प्रार्थना बालसुब्रमण्यम यांना या आजारातून बाहेर काढू शकलेल्या नाहीत.

बॉलिवूड मधील त्यांच्या कारकीर्दीसोबतच तेलगू, तमिळ, कन्नड अशा 16 विविध भाषेत त्यांच्या आवाजाची जादू ऐकायला मिळते. दरम्यान सलमान खानच्या सिनेमातून त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. कालच्या सलमानच्या ट्वीटमधून त्याचे बालसुब्रमण्यम सोबत असलेले जिव्हाळाचं बंध पुन्हा दिसले होते. SP Balasubrahmanyam Dies: लता मंगेशकर, रितेश देशमुख, सुप्रिया सुळे यांच्यासह चाहत्यांकडून एस पी बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली!

सलमान खान याची श्रद्धांजली 

 

 

सलमान खान याच्यासाठी पार्श्वगायक म्हणून बालसुब्रमण्यम यांनी गायलेली गाणी

मेरे रंग मैं रंगनेवाली

आजा शाम होने आई

पहला पहला प्यार

साथिया तुने क्या किया

दरम्यान, एस पी बालासुब्रमण्यम यांनी तेलगू, तामिळ, कन्नड, हिंदी, मल्याळम अशा चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी 16 भारतीय भाषांमध्ये 40,000 पेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड करणारे ते विक्रमवीर गायक ठरले आहेत. त्याची गिनिज बूक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद आहे. बालासुब्रमण्यम यांना त्यांना 6 वेळा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला आहे. त्यांना 2001 मध्ये पद्मश्री आणि 2011 मध्ये पद्मभूषण किताबानं गौरविण्यात आलं आहे.