Meena Kumari Biopic: दिग्दर्शक Hansal Mehta बनवणार मीना कुमारी यांच्या जीवनावर चित्रपट; मुख्य भूमिकेसाठी 'या' अभिनेत्रीची निवड
Meena Kumari (File Image)

चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) मीना कुमारी यांच्या जीवनचरित्रावर चित्रपट (Meena Kumari Biopic) बनवणार आहेत. गेले अनेक दिवस या चित्रपटाची आणि त्यामध्ये कोण मुख्य भूमिका साकारणार याची चर्चा होती. आता माहिती मिळत आहे की, मीना कुमारीच्या भूमिकेसाठी क्रिती सेनॉनची (Kriti Sanon) निवड करण्याची तयारी सुरू आहे. चित्रपटाची निर्मिती टी-सीरीज कंपनी करणार आहे. या बायोपिक चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता करणार आहेत.

एका सूत्राने ETimes ला सांगितले की, 'हंसल यांनी शाहिद, अलीगढ, ओमार्ता आणि छलांग सारखे चित्रपट बनवले आहेत. हंसल मेहता एक उत्तम कथाकार आहेत.  त्यामुळे मीना कुमारीवर चित्रपट बनवण्यासाठी तेच योग्य व्यक्ती आहेत.' हंसल मेहता यांनी 1992 स्कॅम या वेब सीरिजचे यशस्वी दिग्दर्शनही केले होते. मीना कुमारी बायोपिकसाठी क्रिती सेननची शेवटची बोलणी चालू आहेत.

'मिमी'च्या यशानंतर रुपेरी पडद्यावर आव्हानात्मक कथा सांगू इच्छिणाऱ्या चित्रपट निर्मात्यांसाठी क्रिती हे नाव चर्चेत आले आहे. 'किल बिल'च्या रिमेकसाठीही क्रिती चर्चेत आहे. मीना कुमारीच्या बायोपिकबद्दल तिच्या चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. दुसरीकडे कृती सेनन लवकरच आदि पुरुष या चित्रपटात दिसणार आहे. तिच्याशिवाय या चित्रपटात प्रभासचीही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. (हेही वाचा: अमेझॉन ओरिजनल सिरीज ‘Guilty Minds'चा ट्रेलर प्रदर्शित, श्रिया पिळगांवकर आणि वरूण मित्रा मुख्य भूमिकेत)

दरम्यान, 1 ऑगस्ट 1932 ला जन्मलेल्या मीना कुमारी यांनी अभिनेत्री म्हणून 32 वर्ष भारतीय सिनेचाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मीना कुमारी यांनी बालकलाकाराच्या रुपात बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. कहानी, फरजद ए हिंद, लाल हवेली, अन्नपूर्णा, तमाशासारख्या चित्रपटांत त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. आपल्या जवळजवळ 3 दशकांच्या सिनेसृष्टीतील करिअरमध्ये त्यांनी जवळपास 90 पेक्षा जास्त सिनेमांत काम केले. मीना कुमारी यांनी अवघ्या 38 व्या वर्षी 31 मार्च 1972 रोजी अखेरचा श्वास घेतला.