रोमान्स,अॅक्शन, बदला आणि जबरदस्त संवाद यांचे भन्नाट मिश्रण असलेला 'मरजावा' (Marjaavaan)चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) 'एक व्हिलन' या चित्रपटातून पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेत आपल्या समोर येतोय. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) ही जोडी प्रथमच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री देखील पाहायला मिळणार आहे.
मिलाप झवेरी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. ह्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर आपल्याला रितेश आणि सिद्धार्थच्या एक व्हिलन चित्रपटाची झलक पाहायला मिळेल.
पाहा धमाकेदार ट्रेलर:
प्रथमच रुपेरी पडद्यावर आपल्याला सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया ही गोड जोडी पाहायला मिळणार आहे. शिवाय ट्रेलर पाहता या तारा ला खूपच सोज्वळ अशा मुलीचा लूक दिल्याचे दिसत आहे. याआधी सिद्धार्थ आणि तारा या दोघांनीही करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द ईअर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यात सिद्धार्थने स्टुडंट ऑफ द ईअर मधून तर ताराने स्टुडंट ऑफ द ईअर 2 मधून पदार्पण केले होते. एक व्हिलन या चित्रपटानंतर सिद्धार्थचे म्हणावे तसे चित्रपट आले नाही किंबहुना ते बॉक्स ऑफिसवर चालले देखील नाही.
मरजावा या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये जे डायलॉग्स ऐकायला मिळत आहेत ते पाहता ह्या चित्रपटात प्रेक्षकांना भन्नाट डायलॉग्सची मेजवानी मिळणार हे काही वेगळं सांगायची गरज नाही.