Housefull 4 First Look: हाऊसफुल 4 चा फर्स्ट लूक प्रदर्शित, या आधी कधीही पाहिलं नसाल अशा अवतारात दिसतील अक्षय कुमार आणि रितेश देशमुख
HF4 First Look (photo Credits: Twitter)

साजिद नाडियादवाला निर्मित हाऊसफुल सिनेमाच्या मागील तीनही सिक्वेन्सने प्रेक्षकांना लोटपोट करुन हसवलं. त्यामुळे प्रेक्षकांनाही उत्सुकता लागलेली ती हाऊसफुल 4 (Housefull 4) सिक्वेन्सची. प्रेक्षकांमध्ये हाऊसफुलची लोकप्रियता लक्षात घेता साजिद नाडियादवाला (Sajid Nadiadwala)  लवकरच हाऊसफुल 4 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. यात हाऊसफुल च्या पहिल्या तीनही चित्रपटात झळकलेले बॉलिवूडचे दोन अवलिया अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांनी आपल्या सोशल अकाउंटवरुन त्यांचा या चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे.

यात खिलाडी अक्षय कुमारने शेअर केलेल्या फर्स्ट लूक मध्ये अक्की एका राजपूती लूकमध्ये दिसत असून टक्कल केलेलं आहे. त्या पोस्टरमध्ये 'बाला शैतान का साला' असे कॅप्शन दिले आहे.

तर दुसरीकडे रितेश देशमुखने शेअर केलेल्या पोस्टमध्ये रितेश एका नर्तिकेच्या अवतारात दिसत आहे. त्याला नर्तिकी बांगडू महाराज असे कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा- 'हाऊसफुल 4' मधील एका गाण्यामध्ये थिरकताना दिसणार नवाजुद्दीन सिद्दीकी

हा फर्स्ट लूक पाहून प्रेक्षकांमधील या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली असून हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच अक्षय आणि रितेश दोघांनीही येत्या 27 सप्टेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.

या चित्रपटात अक्की आणि रितेश सह बॉबी देओल, राणा डग्गुबत्ती, क्रिती सनॉन, पूजा हेगडे अशी भन्नाट स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. तसेच बॉलिवूडचा हास्यसम्राट जॉनी लिव्हर (Johny Lever) आणि त्याची मुलगी जेमी लिव्हरसुद्धा पाहायला मिळणार आहे. बाबाच्या भूमिकेत असलेला नवाजुद्दीनचा ह्या चित्रपटात काय लूक आणि कशी भूमिका असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.