Nawazuddin Siddhiqui Photo credits: Wiki Commons

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या 'हाऊसफुल 4' (Housefull 4) या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. इतकच नव्हे ह्या चित्रपटात तो इतर कास्टसोबत एका गाण्यात थिरकताना दिसणार आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar) , रितेश देशमुख (Ritesh Deshmukh), बॉबी देओल, राणा डग्गुबत्ती, क्रिती सनॉन, पूजा हेगडे अशी भन्नाट स्टारकास्ट असलेला 'हाऊसफुल 4' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मागील तीनही चित्रपटातून प्रेक्षकांना लोटपोट करुन हसायला लावणारा हाऊसफुल (Housefull)चित्रपटाच्या 4थ्या सिक्वेलमध्ये नवाजुद्दीन सिद्धीकीची एन्ट्री झाली आहे. ह्या सिनेमात तो एका बाबाच्या भूमिकेत दिसणार आहे. इतकच नव्हे तर, ह्या चित्रपटात तो एका गाण्यात 6 अभिनेते आणि 500 बॅकग्राउंड डान्सर्ससोबत नाचण्याचे शिवधनुष्य पेलल्याचे 'मुंबई मिरर' ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. मे महिन्याच्या अखेरीस नवाजुद्दीन ह्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

तसेच ह्या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियावाला (Sajid Nadiyadwala) ह्यांच्यासोबत तब्बल 5 वर्षानंतर एकत्र काम करणार आहे. ह्याआधी सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस स्टारर 'किक' ह्या चित्रपटात नवाजुद्दीन काम केले होते. त्यामुळे साजिदसोबत तो प्रथमच एक कॉमेडीपट करणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा अजून वाढली आहे.

Housefull 4 मधून नाना पाटेकर आऊट, 'बेबी'नंतर अक्षय कुमार आणि राणा दग्गुबाती पुन्हा एकत्र

या चित्रपटात बॉलिवूडचा हास्यसम्राट जॉनी लिव्हर (Johny Lever) आणि त्याची मुलगी जेमी लिव्हरसुद्धा पाहायला मिळणार आहे. बाबाच्या भूमिकेत असलेला नवाजुद्दीनचा ह्या चित्रपटात काय लूक आणि कशी भूमिका असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.