Housefull 4 मधून नाना पाटेकर आऊट, 'बेबी'नंतर अक्षय कुमार आणि राणा दग्गुबाती पुन्हा एकत्र
नाना पाटेकर, राणा दग्गुबाती Phooto Credits : File Image)

#MeToo ही लैंगिक अत्याचाराला वाचा फोडणारी मोहिम आता भारतामध्ये पोहचली आहे. भारतामध्येही #MeToo मुळे झगमगत्या दुनियेतील अनेकांची कृष्णकृत्य समोर आली. यामध्ये बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने नाना पाटेकरांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. या वादामुळे नाना पाटेकर आगामी 'हाऊसफूल 4' सिनेमातून बाहेर पडल्याची चर्चा होती. मात्र आता नाना पाटेकरांऐवजी बाहुबली फेम राणा दुग्गुबाती हा कलाकार सिनेमाचा भाग असल्याची माहिती समोर आली आहे.

हाऊसफुल 4 या सिनेमातून नाना पाटेकर आणि सिनेमाचा दिग्दर्शक साजिद खान हा दूर झाला आहे. या दोघांवरही लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत. आता फराह सामजी सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे.

राणा दुग्गुबातीने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबतचा खुलासा केला आहे. 2015 साली 'बेबी' आणि आता राणा सलग दुसरा चित्रपट अक्षय कुमारसोबत करणार आहे. हैदराबादच्या बाहेरपडून नवा प्रोजेक्ट करणं हा कमाल अनुभव असल्याचं राणाने दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. राणा सोबत 'हाऊसफुल्ल 4' या सिनेमामध्ये बॉबी देओल, रितेश देशमुख, क्रिती सेनॉन, पूजा हेडगे हे कलाकार आहेत. साजिद नाडियादवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 2019 मध्ये   हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या 3 सिक्वेलला बॉक्सऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला होता.