'एक व्हिलन' नकारात्मक भूमिकेत दिसलेला अभिनेता रितेश देशमुख Riteish Deshmukh) पुन्हा एकदा व्हिलनच्या रुपात 'मरजावां' (Marjaavaan) चित्रपटातून आपल्यासमोर आलाय. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला असून गुरुवारी (15 नोव्हेंबर) ला या चित्रपटचा खास प्रिमियर शो झाला. यासाठी बॉलिवूडसह रितेश देशमुख कुटूंबियही उपस्थित होते. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटात रितेश देशमुखही तितकाच महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. त्यामुळे ज्यांनी हा प्रिमियर शो पाहिला अशा त्याच्या मित्रपरिवाराने आणि त्याच्या कुटूंबियाने ट्विटरच्या माध्यमातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यात त्याची पत्नी जेनेलियासह त्याचा भाऊ धीरज देशमुखनेही (Dhiraj Deshmukh) त्याचे विशेष कौतुक केले आहे. यात कमेंट्समध्ये सर्वात भावूक ट्विट ठरले ते रितेश चा भाऊ धीरज याचे जे वाचून नक्कीच तुम्हालाही अभिमान वाटेल.
Wishing the team of #Marjaavaan all the very best. @Riteishd as Vishnu aapka assar dus villain ke barabar Shikayat ka mauka nahi diya aapne - One of your finest performances. @zmilap you have a winner on your hand good luck.
— Dhiraj V Deshmukh (@MeDeshmukh) November 14, 2019
या ट्विटला रितेश देशमुखने दिलेले उत्तर खूपच स्तुत्यप्रिय आहे. त्याच्या या उत्तरातून मराठी अस्मिता, मराठी संस्कृती जपत मराठमोळ्या पद्धतीने आपल्या भावाला उत्तर दिलं. पाहा काय होच त्याचे उत्तर
Thank you very much Amdaar saheb @MeDeshmukh happy you enjoyed #Marjaavan https://t.co/ABE9ga8aO1
— Riteish Deshmukh (@Riteishd) November 15, 2019
धीरज याने या रितेश चा चित्रपटातील डायलॉग बोलत, "तू आम्हाला तक्रार कऱण्याची वेळ दिली नाहीस, इतका सुंदर तुझा अभिनय आहे", असं रितेशला म्हणाला. यावर रितेश देशमुख याने "धन्यवाद आमदार साहेब" असं उत्तर दिले आहे.
देशमुख घराण्यातील अमित, रितेश आणि धीरज देशमुख यांचे बंधूप्रेम सर्वश्रुत आहे. मात्र या ट्विट मधून पुन्हा एकदा या बंधूप्रेमाची झलक पाहायला मिळाली.