Manoj Bajpayee (Photo Credits: Twitter)

अभिनेता मनोज बाजपेयी  (Manoj Bajpai) सध्या 'द फॅमिली मॅन-2' मुळे चर्चेत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी ही वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. सोशल मीडियात याच्या रिलीज बद्दल मागणी केली जात होती. रिलीज नंतर आता वेब सीरिजसाठी मनोज बाजपेयी याचे कौतुक केले जात आहे. येत्या काळात अभिनेत्याकडे काही प्रोजेक्ट्स सुद्धा आहेत. अशी बातमी समोर आली होती की, अभिनेता ऋतिक रोशन याच्या डेब्यू वेब सीरिजमध्ये मनोज बाजपेयी दिसून येणार होता. मात्र आता त्याने या बेव सीरिजला नकार दिला आहे.(सौम्या टंडन हिच्यावर बनावट ID तयार करत लस घेतल्याचा आरोप, संतप्त झालेल्या अभिनेत्री ट्विट करत सांगितले सत्य)

टॉम हिडलेस्टन च्या 'द नाइट मॅनेजर' (The Night Manager) साठी निर्मात्यांनी मनोज बाजपेयी याला हत्यारांच्या डिलर रिचर्ड रोपर्ड याची भुमिका साकारणासाठी विचारले होते. द नाइट मॅनेजरमध्ये ही भुमिका ह्यूग लॉरी याने साकारली होती. तर टॉम हिडलेस्टन यांनी द मॅनेजर मध्ये जोनाथन पाइन याची भुमिका साकारली होती. ऋतिक रोशन याची वेब सीरिज द नाइट मॅनेजर ही हिंदीत रिमेक करण्यात येणार आहे. यासाठीच मनोज बाजपेयी सोबत बातचीत सुरु होती.

मात्र मनोज बाजपेयी यांनी ही भुमिका स्विकारण्यास नकार दिला आहे. मिड डे च्या रिपोर्ट्सनुसार, मनोज बाजपेयीकडे तारखा नसल्याने त्यासाठी नकार कळवला आहे. याच कारणामुळे तो ऋतिक रोशन याच्या डेब्यू सीरिजमध्ये दिसून येणार नाही आहे. (The Family Man Season 2 संपूर्ण सिरीज TamilRockers आणि Telegram वर लीक; मनोज बाजपेयी ची वेबसिरीज पायरसीच्या विळख्यात?)

मिड डे सोबत बातचीत करताना मनोज बाजपेयी संबंधित सुत्रांनी म्हटले की, मनोज सर सीरिजसाठी बातचीत करत होते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्यांच्या आधीच्याच दोन प्रोजेक्टसाठी उशिर झाला आहे. सध्या तो उत्तराखंड मध्ये एका फिल्मच्या शूटिंगमध्ये वस्त आहे.त्यानंतर तो आपल्या उर्वरित प्रोजेक्टसाठी शुटिंग सुरु करणार आहे.तर ऋतिक याच्या बेव सीरिजसाठी निर्मात्यांच्या तारखेनुसार  वेळ नसल्याने त्याला नकार दिला आहे.