Maniesh Paul Tests Positive for COVID-19: 'जुग जुग जियो' सिनेमाच्या टीम मधील वरूण धवन, नीतू कपूर पाठोपाठ मनीष पॉल देखील कोरोनाच्या विळख्यात
मनीष पॉल (Image Credit: Instagram)

काही दिवसांपूर्वी कोविड 19 चा सामना करत बॉलिवूडकरांनी हळूहळू चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. पण जुग जुग जियो या सिनेमाच्य टीमला कोरोना वायरसने आपल्या विळख्यात घेतलं आहे. यापूर्वीच या सिनेमातील कलाकार मंडळींपैकी अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) , अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर आता या सिनेमामधील अजून एक कलाकार म्हणजे अभिनेता मनीष पॉल (Maniesh Paul) याला देखील कोविड 19 ची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. असे काही मीडिया रिपोर्ट्सद्वारा समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मनीषला हलकासा ताप आल्याने त्याची कोविड टेस्ट करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह असल्याचं सांगण्यात आलं आहे. Jug Jugg Jeeyo च्या सेटवर कोरोनाचा हैदोस! वरुण धवन, नीतू सिंह आणि अनिल कपूर आढळले COVID-19 पॉझिटिव्ह.

दरम्यान मागील आठवड्यात जुग जुग जियोचे दिग्दर्शक राज मेहता, अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री नितू कपूर कोविड 19 पॉझिटीव्ह आहेत. यापैकी वरूण धवन आयसोलेशनमध्ये आहे. तर नीतू कपूर यांना मुंबईमध्ये आणण्यासाठी रणबीर कपूरने विशेष एअर एम्ब्युलंसची सोय केली आहे.

मनीष मल्होत्रा याने नोव्हेंबर महिन्यात जुग जुग जियो सिनेमाच्या टीमला जॉईन केले होते मात्र टीम मधील अन्य कलाकार कोविड 19 पॉझिटीव्ह असल्याचं समजल्यानंतर चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे. मनीष त्यानंतर मुंबईमध्ये परतला. TOI च्या सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईमध्ये परतल्यानंतर ताप आल्याने त्याची कोविड टेस्ट करण्यात आली जी पोजिटिव्ह आली आहे.

जुग जुग जियोच्या सेटवरील अन्य कलाकारांमध्ये अभिनेता अनिल कपूर, कियारा अडवाणी यांची टेस्ट निगेटीव्ह आली आहे. दरम्यान मोस्टली सेन प्राजक्ता कोळी देखील या सिनेमाचा भाग आहे. ती देखील मुंबईमध्ये परतली आहे.

मनीष मल्होत्रा हा सूत्रसंचालक म्हणून अनेकदा रसिकांसमोर आला आहे पण पहिल्यांदाच 'जुग जुग जियो'च्या माध्यमातून तो धर्मा प्रोडक्शन आणि राज मेहता यांच्या सिनेमात झळकणार आहे. सिनेमाच्या सेटवरून त्याने पहिला फोटो देखील काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केला होता.