रेमडेसिवीर इंजेक्शन ला Remo D'Souza म्हणणाऱ्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल; खुद्द रेमो ने केला शेअर मजेशीर प्रसंग
Remo Dsouza (Photo Credits-Twitter)

सोशल मीडियावर काय व्हायरल होईल, याचा नेम नाही. आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक मुलगा रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शनला चक्क रेमो डिसूजा (Remo D'Souza) बोलत आहे. हा मजेशीर व्हिडिओ खुद्द रेमो ने शेअर केला असून व्हिडिओ पाहून त्यालाही हसू आवरले नाही. व्हिडिओत एक मुलगा पत्रकाराला बाईट देताना आपला संताप व्यक्त करत आहे. रागात आणि तावातावाने बोलण्याच्या नादत रेमडेसिवीर चा उच्चार तो चक्क 'रेमो डिसूजा' असा करतो.

रेमो ने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना रेमोने लिहिले, "शेवट पाहण्यास विसरु नका. सिप्लाचा रेमो डिसूजा. फक्त मनोरंजनासाठी." (हे ही वाचा: सरोज खान यांच्या जीवनावर आधारित नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूजा बनवणार फिल्म; मास्टरजींसमोरही व्यक्त केली होती आपली 'ही' इच्छा)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Remo Dsouza (@remodsouza)

रेमो ने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रीया येत आहेत. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांना या व्हिडिओवर कमेंट करण्याचा मोह आवरता आलेला नाही. भारती सिंह, अपारशक्ति खुराना, सूरज पंचोली, मनीष पॉल यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. दरम्यान, ईटाईम्स शी बोलताना रेमो ने त्याचा देखील रेमडेसिवीर बोलताना गोंधळ उडत असल्याचे सांगितले.

सध्या देशात कोरोनाचे संकट अधिक दाट झाले आहे. अशा परिस्थितीत आरोग्य सुविधांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. त्याचत काळाबाजार, गैरव्यवहार यांचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी नागरिक संतप्त झाले असून हा मुलगा देखील रागात आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे.