सरोज खान यांच्या जीवनावर आधारित नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूजा बनवणार फिल्म; मास्टरजींसमोरही व्यक्त केली होती आपली 'ही' इच्छा
Remo D'souza And Saroj Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान (Saroj Khan) यांच्या निधनाने अवघा बॉलिवूड हळहळला. त्यांच्या जाण्याने दु:ख त्यांच्या कुटूंबियांना पचवणे जितके जड होते तितकेच त्याच्या चाहत्यांनाही. आपल्या करिअरमध्ये सरोज खान यांनी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांसह अनेकांना आपल्या तालावर नाचवले आणि एकाहून एक सुपरहिट गाणी दिली. त्यांचा हा अद्भूत नृत्याविष्कार पाहता सध्याचे आघाडीचे नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूजा (Remo D'souza) यांनी सरोज खान यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशी बातमी समोर येत आहे की रेमो डिसूजा लवकरच सरोजा खान यांची बायोपिक बनवून शकतात.

रेमो डिसूजा ने एक मुलाखतीदरम्यान असे सांगितले आहे की, सरोज खान यांच्यावर फिल्म बनवू इच्छितो. हे त्यांचे ड्रिम प्रोजेक्ट असेल. रेमो ने सरोज खान हयात असताना त्यांच्याशी बोलताना ही इच्छा व्यक्त केली होती. तुमचे आयुष्य प्रेरणा देणारे असून त्याच्यावर चित्रपट बनवला जाऊ शकतो. ज्यावर सरोजींनी त्याला लवकर हा चित्रपट बनव असे सांगितले होते. RIP Saroj Khan: नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्या निधनाने रेमो डिसूजा, फराह खान, अक्षय कुमार, जेनेलिया देशमुख यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली!

नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूजा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत "सरोज खान यांच्या निधनाची बातमी ऐकून प्रचंड दु:ख झाले. सरोज खान स्वत:मध्ये एक इन्स्टिट्यूट होत्या. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले, त्यांच्यासोबत काम करण्यात आणि खुद्द त्यांना डायरेक्ट करण्याची संधी मला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो." असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरोज खान यांनी आपल्या करिअरमध्ये 2000 पेक्षा अधिक गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. ज्यात डोला रे डोला, एक दो तीन, ये इश्क हाय, मार डाला या सुपरहिट गाण्याचा समावेश आहे.