Kundara Johny News: प्रसिद्ध मल्याळी अभिनेते कुदारा जॉनी यांचे निधन झाले आहे. ते 71 वर्षांचे होते. प्राप्त माहितीनुसार, कोल्लम येथीलल एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Malayalam Cinema Loses Iconic Villain Kundara Johny) हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आला. FEFKA डायरेक्टर्स युनियनच्या फेसबुक पोस्टद्वारे ही बातमी त्यांचे चाहते आणि हितचींतकांना कळविण्यात आली. सन 2022 मध्ये आलेल्या "मेप्पडियन" या चित्रपटात ते शेवटचे ऑन-स्क्रीन दिसले होते. अतिशह चौफेर अभिनय आणि अभ्यासू व्यक्तीमत्व गमावल्याची भावना त्यांच्या निधनानंतर मल्याळी सिने इंडस्ट्रीमधून व्यक्त होत आहे.
FEFKA डायरेक्टर्स युनियनच्या फेसबुक पोस्टमध्ये दिलेल्या माहितीचा मराठी भावार्थ असा की, अभिनेता कुंदारा जॉनी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने 71 व्या वर्षी निधन झाले. छातीत दुखू लागल्यानंतर त्यांना कोल्लममधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. जॉनी हे मल्याळी लोकांमधील एक लाडका अभिनेता होते. त्यांच्या खलनायकी आणि खास भूमिकांसाठी त्यांना ओळखले जायचे. खास करुन त्यांनी खलनायकी भूमिकांसाठी प्रसिद्धी मिळवली आणि शंभरहून अधिक चित्रपट अक्षरश: गाजवले. त्याचा सिनेसृष्टी प्रवास 1979 मध्ये 'नित्यवसंतम' मधून सुरू झाला आणि 'मेप्पडियानी' या चित्रपटाद्वारे त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सांगता केली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, स्टेला, ज्या फातिमा माता नॅशनल कॉलेज, कोल्लम येथे शिक्षिका आहेत.
FEFKA फेसबुक पोस्ट
दरम्यान, केरळचे अर्थमंत्री, के एन बालगोपाल यांनी, जॉनी यांच्या निधनाबद्द शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटले आहे की, चार दशकांहून अधिक काळ गाजवलेल्या आणि 500 हून अधिक चित्रपटांचा प्रभावशाली पोर्टफोलिओ त्यांची दमदार कारकीर्द दर्शवतो. गुणी अभिनेता हरपल्याबद्दल प्रचंड दु:ख व्यक्त होत आहे.
इन्स्टा पोस्ट
View this post on Instagram
कुंदारा जॉनी यांनी 1979 मध्ये त्यांच्या चित्रपटसृष्टीचा प्रवास सुरू केला आणि मल्याळम सिनेमात त्यांच्या संस्मरणीय नकारात्मक भूमिकांसह अमिट छाप सोडली. त्याचे अभिनय अगणित चित्रपट रसिकांच्या हृदयात कोरले गेले आहेत, विशेषत: "किरीदम" आणि "चेनकोल" सारख्या ब्लॉकबस्टर हिटमध्ये, ज्याने व्यावसायिक यश आणि समीक्षकांची प्रशंसा दोन्ही मिळवली. "माय फॅन रामू," "रौद्रम," आणि "थचिलेदथु चुंदन" या त्यांच्या इतर उल्लेखनीय कामांचा समावेश आहे. कुंदारा जॉनी यांचे मल्याळम चित्रपटातील योगदान कायमचे स्मरणात राहील आणि साजरे केले जाईल आणि त्यांची अनुपस्थिती संपूर्ण उद्योगात आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांमध्ये जाणवेल, अशी भावना त्यांचे चाहते व्यक्त करत आहेत.