Malang Title Track Out: काफिरा तो चल दिया इस सफर के संग... दिशा पटानी आणि आदित्य रॉय कपूर यांच्यातील अनोखी केमिस्ट्री पहा या गाण्यातून (Video Inside)
Malang Title Track (Photo Credits: YouTube)

Malang Title Track Video: दिशा पटानी आणि आदित्य रॉय कपूर अभिनित मलंग चित्रपटाचे टायटल ट्रॅक नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात, दिशा आणि आदित्य यांच्यातील सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्याचसोबत, गाण्याचे बोल आणि संगीत याची उत्तम सांगड असल्याने हे टायटल ट्रॅक खुपाच सुंदर झाले आहे असं म्हणायला हरकत नाही.

मलंग चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचसोबत चित्रपटातील रोमँटिक गाण्यांमध्ये दिशा आणि आदित्यची फ्रेश जोडी तर दिसतेच पण आता या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी देखील फॅन्स खूपच उत्सुक आहेत.

मलांगचा टायटल ट्रॅकमध्ये एकमेकांना शोधत असलेल्या दोन व्यक्तींची झलक दिसते. मलंग या शब्दाचा अर्थ म्हणजे कोणतीही चिंता न करत आयुष्य जगले तरीही एकमेकांना भेटल्यावर होणार आनंद मात्र वेगळाच असतो. कुणाल वर्मा आणि हर्ष लिंबाचिया यांनी हे गीत लिहिले आहे, तर वेद शर्मा यांनी हे गाणं संगीतबद्ध करून आपला आवाज या गाण्याला दिला आहे.

चित्रपटातील इतर गाणी प्रेक्षकांमध्ये बरीच लोकप्रिय होत आहेत. सोशल मीडियावर देखील चाहत्यांमध्ये मलंगची भरभरून चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान, या चित्रपटात, आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानी यांच्यासह अनिल कपूर आणि कुणाल खेमूदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

काठियावाड येथे राहणारी गंगा कशी बनली कामाठीपुरा मधील 'गंगुबाई काठियावाडी'? जाणून घ्या तिच्या आयुष्याची खरी कहाणी

“मलंग या फिल्मसोबत मी मला आवडणाऱ्या शैलीत परत येत आहे, याचा मला सर्वात जास्त आनंद होतोय. ही कथा तीव्र, कठोर आणि विलक्षण असेल. मला आशा आहे की मलंग जितका रोमांचकारी आहे तितकाचं रोमांचक अनुभव प्रेक्षकांना देखील अनुभवता येईल, ”असे चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सूरी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. लव्ह फिल्म्स आणि टी-सीरिजच्या बॅनरखाली तयार केलेला हा चित्रपट फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.