Malaika Arora चे खास पेडेंट; हा Arjun Kapoor सोबतच्या नात्याचा इशारा? (Photo)
अर्जुन कपूर-मलायका अरोरा (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांच्यात वाढणारी जवळीक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रिपोर्ट्सनुसार, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पुढच्या वर्षी विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. रिलेशनशीपच्या चर्चेला दोघांनी दुजोरा दिला नसला तरी त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. त्याचबरोबर अनेक सोशल मीडिया पोस्टमधून दोघांची वाढती जवळीक दिसून येते. अलिकडेच मलायका अरोराने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. यातून तिला अर्जुन आणि तिच्या नात्याच्या इशारा द्यायचा आहे, असे दिसते. कारण मलायकाने गळ्यात 'AM' हे इनिशियल्स असलेले पेंडेट घातले आहे.

तुम्हीही पाहा फोटो...

 मलायका अरोरा (Photo Credits: Instagram)

काही दिवसांपूर्वी दोघांना रेस्टॉरंटबाहेर एकत्र स्पॉट करण्यात आले. तर मलायका आपल्या वाढदिवसानिमित्त अर्जुनसोबत इटलीला गेली होती. दोघांना इटली एअरपोर्टवरही एकत्र पाहण्यात आले होते.

इतकंच नाही तर अर्जुन कपूरने करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शो मध्ये देखील आपल्या खाजगी आयुष्याबद्दल खास खुलासा केला होता. मी आता सिंगल नसून लग्नासाठी एकदम तयार असल्याचे अर्जुनने शो मध्ये  म्हटले होते.