Vogue Beauty Awards मधील मलायका च्या हॉट लूक ने सोशल मिडियावर लावली आग, बहुतांशी चाहत्यांनी दिली अशी भन्नाट प्रतिक्रिया
Malaika Arora (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची बिनधास्त आयटम गर्ल तसेच बोल्ड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या हॉट लूकमुळे सोशल मिडियावर बरीच चर्चेत असते. तिचा सेक्सी अंदाज नेहमीच तिच्या चाहत्यांना आकर्षित करतो. तिचा ग्लॅमरस अंदाज न केवळ तिच्या चाहत्यांसाठी तर बॉलिवूडकरांसाठी देखील चर्चेचा विषय असतो. नुकत्याच Vogue Beauty Awards मध्ये रेड कार्पेट मध्ये मलायका आपली बहिण अमृता अरोरा सह दिसली. यात तिचा हॉट लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. हे फोटो मलायकाने सोशल मिडियावर शेअर करताच तिच्या चाहत्यांनी अशा काही भन्नाट कमेंट्स दिल्यात की जे पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या कमेंट्समध्ये बहुतांशी चाहत्यांनी एकच प्रतिक्रिया पुन्हा पुन्हा दिली आहे, ज्यात तिच्या लूकचा अंदाज आपल्याला लक्षात येईल.

हेही वाचा- अर्जुन कपूर सोबत लग्नाच्या चर्चेवर मलायका अरोरा हिने अखेर सोडले मौन

सर्व चाहत्यांनी दिलेले आगीचे इमोजी दिले असून थोडक्यात मलायका या लूकमध्ये खूपच हॉट दिसतेय असे त्यांना सांगायचे आहे. मलायका ने पांढ-या रंगाचा गाऊन घातला असून हा गळ्यापासून थोडा खाली आहे (Deep) आहे. यात तिचे मेसी हेअर आणि गडद लिपस्टिकने तिच्या लूकला चार चांद लावले आहेत.

काही महिन्यांपूर्वीच मलायका आणि अर्जुनने त्यांच्या नात्याची ग्वाही दिली होती. तेव्हापासूनच त्यांच्या नात्याने सर्वांचं लक्ष वेधलं. विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यापासून व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत सुट्टीवर जाणं म्हणू नका, प्रत्येक वेळी मलायका आणि अर्जुनने #CoupleGoals दिल्याचं पाहायला मिळालं आहे.