अर्जुन कपूर सोबत लग्नाच्या चर्चेवर मलायका अरोरा हिने अखेर सोडले मौन
Arjun Kapoor and Malaika Arora (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री, आयटम गर्ल मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांच्या अफेअरची जोरदार चर्चा असताना लवकरच ते विवाहबद्ध होणार असल्याचे वृत्त समोर आले होते. इतकंच नाही तर लग्नाची तारीखही ठरल्याची चर्चा होती. या सर्व चर्चा रंगत असताना मलायका अरोरा हिने यावर अखेर मौन सोडले आहे. 19 एप्रिलला बॉलिवूड स्टार मलायका अरोरा-अर्जुन कपूर विवाहबंधनात अडकणार?

मलायका-अर्जुन 19 एप्रिलला विवाहबद्ध होणार असून ख्रिश्चन पद्धतीने हा विवाहसोहळा संपन्न होणार असल्याची माहिती समोर आली होती. परंतु, मलायकाने बॉम्बे टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या चर्चा या निव्वळ अफवा आहे. यात खरं काही नाही. तर अर्जुन-मलायकाच्या लग्नाचे वृत्त चुकीचे असल्याचं स्पष्टीकरण खुद्द बोनी कपूर यांनीही दिलं आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून मलायका-अर्जुन यांच्या अफेअरची चर्चा बॉलिवूड वर्तुळात आहे. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. मात्र दोघांनीही आपल्या नात्याबद्दल मौन बागळणेच योग्य समजले आहे.

2017 मध्ये मलायका अरोराचा अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाला. तब्बल 18 वर्षांच्या संसारानंतर दोघेही वेगळे झाले. त्यानंतर मलायका-अर्जुनच्या नावाची चर्चा होऊ लागली. तर अरबाजचे नाव जॉर्जिया अँड्रियानीसोबत जोडले गेले.