
बॉलिवूडमध्ये सध्या मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल जोरदार चर्चा सुरु आहेत. तसेच या दोघांनी अद्याप उघडपणे प्रेमाची कबुली दिली नसली तरीही दोघे बऱ्याच वेळा एकमेकांसोबत मीडियात झळकले आहेत. त्यानंतर मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या लग्नाबद्दलच्या गोष्टी व्हायरल झाल्या होत्या. मात्र येत्या 19 एप्रिल रोजी मलायका आणि अर्जुन विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलायका आणि अर्जुन यांनी त्यांच्या नात्याबद्दल गुपप्ता पाळली असून कोठेही याबद्दर जाहीर केले नाही आहे. तसेच या दोघांच्या एका निकटवर्तीयाने मीडियाला दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती दिली आहे. येत्या 19 एप्रिल रोजी ख्रिस्ती पद्धतीने विवाह होणार असून फक्त कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाला आमंत्रण देण्यात येणार आहे.(हेही वाचा-अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा डिनर डेटच्या निमित्ताने एकत्र ; फोटोज व्हायरल)
यापूर्वी मलायका हिचा विवाह अरबाज खान ह्याच्या सोबत झाला होता. तसेच 18 वर्षाचा संसार मोडत या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. तर सध्या अरबाज हा त्याची प्रेयसी जॉर्जिया एण्ड्रीयानी हिच्या सोबत फिरताना दिसून येतो.