बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या रिलेशनशीपच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. त्यातच हे दोघंही पुढच्या वर्षी विवाहबद्ध होतील, अशा चर्चा होत्या. तर दुसरीकडे अर्जुन कपूर सध्या त्याच्या बहिणींच्या लग्नाचे प्लॅनिंग करत असल्याचेही बोलले जात होते. रिलेशनशीपवर अर्जुन-मलायका काही स्पष्टपणे बोलले नसले तरी या दोघांमधील वाढलेली जवळीक मीडिया कॅमेऱ्यातून काही सुटलेली नाही. अनेकदा या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.
आता पुन्हा एकदा 6 नोव्हेंबरच्या संध्याकाळी अर्जुन-मलायका यांना मुंबईतील बांद्रा येथील एका रेस्टोरॅन्टजवळ एकत्र स्पॉट करण्यात आले. येथे दोघेही डिनरच्या निमित्ताने भेटले होते. त्यावेळेस हे दोघेही मीडिया कॅमेऱ्यात कैद झाले.
View this post on Instagram
हे फोटो आणि व्हिडिओज पाहुन तुम्हाला यांच्या नात्याचा उलघडा होईलच. या फोटोजनंतर अर्जुन-मलायकाचे नाते अधिकच चर्चेत येईल, यात वाद नाही.