Mahatma Gandhi Death Anniversary: भारत देशाचे 'राष्ट्रपिता' म्हणून ओळख असणाऱ्या महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची आज 71वी पुण्यतिथी आहे. त्यामुळे देशभरात विविध ठिकाणी महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील घटनांवर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात बॉलिवूड सृष्टीतही महात्मा गांधी यांच्यावर आधारित चित्रपट बनवण्यात आले आहेत. त्यामुळे बॉलिवूड मधील हे 5 चित्रपट गांधीजींचे जरुर पाहा. तसेच गांधींनी देशासाठी केलेले कार्य किती बहुमोलाचे आहे याचा प्रत्यय तुम्हाला या चित्रपटांमधून जाणवेल.
1982 रोजी बनविण्यात आलेला 'गांधी' (Gandhi) हा चित्रपट महात्मा गांधी यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित कथेवर आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रिचर्ड एटनबरो यांनी केले होते. तर गांधींजींची भूमिकेतून बेन किंग्सले झळकला होता. या चित्रपटासाठी दोघांना ऑक्सरने आकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. गांधी या चित्रपटाला अकादमी पुरस्कारासह अन्य आठ अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. (हेही वाचा-दांडी येथे 'मीठ सत्याग्रह' स्मारकाची उभारणी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन)
तसेच अभिनेता संजय दत्त याचा बहुचर्चित चित्रपट 'लगे रहो मुन्नाभाई' (Lage Raho Munna Bhai) यामधून ज्या पद्धतीने गांधीजींचे व्यक्तिमत्व दाखवले आहे त्याला दुसरी कशाचीच तोड नाही. चित्रपटात मराठी कलाकार दिलीप प्रभावळकर यांनी उत्तमरित्या गांधीजींची भूमिका साकारली आहे.
काही चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी गांधीजींच्या नव्या रुपाची ओळख करुन दिली आहे. 'हे राम' (Hey Ram) हा चित्रपट त्यापैकी एक आहे. अभिनेता कमल हसन यांची दमदार भूमिका आणि नसीरुद्दीन शाह यांनी स्विकारलेली गांधीची अफलातून भूमिका आठवणीत राहणारी आहे.
1993 रोजी प्रदर्शित करण्यात आलेला 'सरदार' (Sardar) हा चित्रपट जरी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्यावर आधारित आहे. तरीही पटेल आणि गांधीजींना स्वातंत्र्य लढ्यातील संघर्ष दाखविण्यात आला आहे. या चित्रपटात पटेल यांच्या भूमिकेत परेश रावल आणि गांधींच्या भूमिकेत अन्नु कपूर दिसून आले आहेत.
त्याचसोबत 1996 मध्ये 'मेकिंग ऑफ महात्मा' (Making Of Mahatma) या गांधीजींचे आयुष्य कसे खडतर होते त्याचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात रजत कपूर याने तरुणपणीच्या गांधींची भूमिका सुरेखपणे साकारली आहे. तसेच चित्रपटाची कथा ही जेव्हा गांधीजी साऊथ आफ्रिकेत राहत असतानाची आहे. तर चित्रपट फितिमी बीर यांचे पुस्तक ‘The Apprenticeship of a Mahatma’ याच्यातील कथेवर आधारित आहे.