High Court Notice to Kareena Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची नोटीस; ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
Kareena Kapoor (PC - Instagram)

High Court Notice to Kareena Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानच्या (Kareena Kapoor Khan) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या (Madhya Pradesh High Court) जबलपूर खंडपीठाने करीना कपूरला नोटीस बजावली आहे. 'करीना कपूर प्रेग्नन्सी बायबल' (Kareena Kapoor Khan's Pregnancy Bible) नावाच्या वादग्रस्त पुस्तकाबाबत ही नोटीस देण्यात आली आहे. करीना कपूर व्यतिरिक्त न्यायमूर्ती जीएस अहलुवालिया यांच्या एकल खंडपीठाने आदिती शाह भीमजियानी, ॲमेझॉन इंडिया, जुगरनॉट बुक्स आणि इतरांनाही नोटीस बजावली आहे आणि त्यांचे उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 जुलै रोजी होणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, जबलपूर सिव्हिल लाइनचे रहिवासी ख्रिस्तोफर अँथनी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्यामध्ये त्यांनी 'करीना कपूर प्रेग्नन्सी बायबल' या पुस्तकाद्वारे ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. (हेही वाचा -UNICEF India: अभिनेत्री Kareena Kapoor-Khan ची युनिसेफ इंडियाची National Ambassador म्हणून नियुक्ती (Video))

याचिकेद्वारे करीना कपूरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. करीना कपूर खानने लोकप्रियता मिळवण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे, ज्याचे मुखपृष्ठ देखील आक्षेपार्ह आहे, असेही सांगण्यात आले आहे. वकील क्रिस्टोफर अँथनी यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली असून असा युक्तिवाद केला की करीना कपूर खानने तिचा गर्भधारणा अनुभव सांगण्यासाठी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. (वाचा - Dhoni 3 Sixes: धोनीच्या 3 षटकारांनंतर करीना कपूर आणि नेहा धुपियाचा स्टेडियममधील 'तो' व्हिडिओ व्हायरल (Watch Video))

पुस्तकाच्या नावात बायबल जोडल्याने ख्रिश्चन धर्माच्या लोकांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. पुस्तकाचे शीर्षक बायबलमधून घेतले आहे. बायबल हा ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांचा पवित्र धार्मिक ग्रंथ आहे. त्यामुळे या प्रकरणी ख्रिश्चन समाजाच्या वतीने अभिनेत्री विरुद्ध निवेदन व निषेध करण्यात आला आहे.