UNICEF India's National Ambassador: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानची युनिसेफ इंडियाची राष्ट्रीय राजदूत (National Ambassador) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. करीना कपूर गेल्या 15 वर्षांपासून मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या क्षेत्रात युनिसेफ इंडियाला मदत करत आहे. याआधी करीना कपूरची 2014 मध्ये युनिसेफ सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. युनिसेफ ही संस्था विविध देशांमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी काम करत आहे.

युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड किंवा युनिसेफची स्थापना करण्याचा प्रारंभिक उद्देश, द्वितीय विश्वयुद्धात नष्ट झालेल्या राष्ट्रांच्या मुलांना अन्न आणि आरोग्य सेवा प्रदान करणे हा होता.  11 डिसेंबर 1946 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने त्याची स्थापना केली होती. पुढे 1953 मध्ये युनिसेफ संयुक्त राष्ट्रांचा स्थायी सदस्य बनला. युनिसेफला त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी 1965 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

युनिसेफ इंडियाची नवीन राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल, करीना कपूर खान म्हणाली, ’मी यासाठी दहा वर्षे वाट पाहिली. अथक परिश्रम केले आणि सर्वांसोबत खूप मेहनत घेतली. आता मी राष्ट्रीय राजदूत म्हणून सामील होत आहे. पण अर्थातच त्यासोबत एक मोठी जबाबदारी येते, जी मी स्वीकारते. मी देशातील प्रत्येक मुलाला त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी, तसेच असुरक्षित मुलांसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी माझा आवाज आणि प्रभाव वापरण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन.’ (हेही वाचा: 'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुली राजकारणात उतरली; नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश)

पहा पोस्ट आणि व्हिडिओज-

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)