करण जोहरचा (Karan Johar) आगामी चित्रपट 'कलंक' (Kalank) मधील अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)हिचे नवीन लूक मधील पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.तर माधुरी पुन्हा एकदा एवरग्रीन ब्युटीमधून प्रेक्षकांची मने जिंकत आली आहे. कलंक चित्रटामधून माधुरी बहार बेगम हिची भुमिका साकारत आहे.
या लूकमध्ये माधुरी हिने झुमके, टिकली आणि रिंग घातलेली दिसून येत आहे. तसेच वेलव्हेट रंगाचा कुर्ता आणि ओढणीमुळे ती अधिच खुलुन दिसत आहे. बेगमची भुमिका करायला मिळाल्यामुळे माधुरी अत्यंत खुश असल्याचे तिने म्हटले आहे.(हेही वाचा-'कलंक' मधून राणीच्या रुपात झळकली आलिया भट्ट, चित्रपटाचे नवीन पोस्टर लॉन्च)
तत्पूर्वी माधुरी या चित्रपटातील भुमिका साकारत आहे ती यापूर्वी श्रीदेवी साकारणार होती. मात्र श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर माधुरी हिला या चित्रपटात काम करण्यासाठी विचारण्यास आले होते. येत्या 17 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.