32 Years of Ram Lakhan: 'राम लखन' चित्रपटातील कलाकार 32 वर्षांनतर आता कसे दिसतात? माधुरी दीक्षितने शेअर केला फोटो
Ram Lakhan Team (Photo Credit: Instagram)

अनिल कपूर (Anil Kapoor), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांच्या 'राम लखन' (Ram Lakhan) चित्रपटाला आज 32 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट 27 जानेवारी 1989 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी हा चित्रपट सुपर-डुपर हिट झाला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. तसेच या चित्रपटात मुख्य भुमिका साकरणारे अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि जॉकी श्रॉफ यांच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला अनेक वर्ष झाली असली तरी प्रेक्षक आजही हा चित्रपट आवडीने पाहतात. मात्र, 32 वर्षानंतर या सिनेमातील स्टार कास्ट कसे दिसतात? याचा एक फोटो माधुरी दीक्षितने सोशल माडियावर शेअर केला आहे. या फोटोला मोठी पसंती दर्शवली जात आहे.

नुकताच माधुरी दीक्षित यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्यांनी राम लखन चित्रपटाची स्टार कास्त आता कशी दिसते? हे सांगितले आहे. या फोटोत माधुरी दीक्षित अनुपम खेर, जॅकी श्रॉफ, गुलशन ग्रोव्हर, अनिल कपूर, सुभाष घई आणि सतीश कौशिकसोबत बसलेली दिसत आहे. हे देखील वाचा- Rohit Shetty Instagram Post: बॉलिवूड चित्रपट निर्माता रोहित शेट्टीने चक्क हातानेच उचलली कार; पाहा संपूर्ण व्हिडिओ

माधुरी दीक्षितची इंस्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

या फोटोला कॅप्शन देत माधुरी दीक्षितने असे लिहले आहे की, या चित्रपटाला 32 वर्ष पूर्ण झाली आहे. त्याबरोबर आम्ही बनवलेल्या आठवणींचा आनंद साजरा करताना, या चित्रपटातील कलाकारांचे काम पाहण्यासाठी आणि या कामाला पसंती दर्शवण्यासाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद.

दरम्यान, माधुरी दीक्षितने राम लखन चित्रपटातील स्टार कास्टचा जुना फोटो आणि आताचा फोटो एकत्र करून शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर राम लखन चित्रपटाच्या कलाकरांवर शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे.