Rohit Shetty Instagram Post: बॉलिवूड चित्रपट निर्माता रोहित शेट्टीने चक्क हातानेच उचलली कार; पाहा संपूर्ण व्हिडिओ
Rohit Shetty (Photo Credit: Instagram)

बॉलिवूड चित्रपट निर्माता रोहित शेट्टी (Rohit Shetty) हा अ‍ॅक्शन चित्रपटासाठी प्रसिद्ध आहेत. त्याच्या चित्रपटांमधे चारचाकी गाड्या उंच आकाशात उडताना आपण पाहिले आहे. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ (Video) पोस्ट केला आहे. या व्हिडिओत रोहित शेट्टी चक्क हाताने उचलताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, सर्वसामान्यांपासून तर, बॉलिवूडच्या अनेक कलाकरांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. तसेच या व्हिडिओवर युजर्सकडून कमेंटचा वर्षाव केला जात आहे.

नुकताच रोहित शेट्टीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रोहित शेट्टीने एका गाडीचा पुढचा भाग हाताना उचलला आहे. गाडी उचलताना रोहित शेट्टी अतिशय अंनदात दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ शेअर करताना रोहित शेट्टीने असे कॅप्शन दिले आहे की, कोणतीही प्रोटीन किंना सप्लीमेंट नाही, केवळ देशी घी आणि घरच्या जेवणाची ही कमाल आहे. माझे मीमर्स सांगत होते की, टेस्ला येत आहे. हे देखील वाचा- Nia Sharma Bold Video: नागिन फेम अभिनेत्री निया शर्माने केले बोल्ड फोटोशूट; ब्लॅक साडीतील व्हिडिओ व्हायरल

रोहित शेट्टी यांची इंस्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

रोहित शेट्टी यांचा अगामी चित्रपट सर्कस लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर त्याची 'सूर्यवंशी' देखील रिलीजसाठी सज्ज झाली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. अक्षय कुमार आणि कतरिना कैफ या चित्रपटात झळकणार आहेत.