Maay Bhavani Song in Tanhaji: अजय-काजोल या जोडीचा मराठमोळा अंदाज आणि सुंदर नृत्याविष्कार पाहा तानाजी चित्रपटातील 'माय भवानी' या गाण्यातून, Watch Video
Maay Bhavani Song (Photo Credits: YouTube)

गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला ‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’(Tanhaji: The Unsung Warrior) हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यानंतर प्रदर्शित झालेले 'शंकरा रे शंकरा' या गाण्याने या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता आणखीनच वाढली आहे. नुकतेच या चित्रपटातील 'माय भवानी' (Maay Bhavani) हे गाणे प्रदर्शित झाले आहे. सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांचा दमदार आवाज आणि जोडीला अजय देवगण (Ajay Devgan) आणि काजोलच्या (Kajol) नृत्याविष्काराने या गाण्याचे महत्व आणखीनेच वाढवले आहे. तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कथा या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

शिवाजी महाराजांविषयी कोणताही विषय असला मग तो त्यांच्या मावळ्यांचा असो किंवा विश्वासू सरदारांचा असो प्रत्येक मराठ्याचं रक्त सळसळतच. हाच विषय घेऊन येत्या 10 जानेवारीला ‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच या भवानी मातेची महती गाण्यातून सांगणारे या चित्रपटातील 'माय भवानी' हे गाणे एकदा पाहाच

हेदेखील वाचा- Tanhaji Marathi Trailer: 'अ‍जय देवगण' ची मुख्य भूमिका असलेल्या तानाजी सिनेमाचा मराठमोळा ट्रेलर रसिकांच्या भेटीला

हे गाणे सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग (Sukhwinder S) आणि श्रेया घोसाल (Shreya Ghoshal) यांनी गायले असून अजय अतुल यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, जगपती बाबू, पंकज त्रिपाठी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पुढच्या वर्षी 10 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  अलीकडेच Tanhaji: The Unsung Warrior या  आगामी चित्रपटाचा मराठी ट्रेलर देखील रसिकांच्या भेटीला आला.  काजोलने मराठी भाषेत ट्वीट करत त्याची झलक रसिकांसोबत शेअर केली होती.