Harman Baweja Blessed With Baby Girl: 'लव्ह स्टोरी 2050' फेम हरमन बावेजा दुस-यांदा बनला बाबा; पत्नी साशाने दिला मुलीला जन्म
Harman Baweja Blessed With Baby Girl (PC - Instagram)

Harman Baweja Blessed With Baby Girl: बॉलिवूड अभिनेता हरमन बावेजा (Harman Baweja) आणि त्याची पत्नी साशा रामचंदानी (Sasha Ramchandani) पुन्हा एकदा आई-बाबा झाले आहेत. 43 वर्षीय हरमन बावेजा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्यांच्या पत्नीने मुलीला जन्म दिला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हरमन बावेजाने दुसऱ्या मुलाचे स्वागत केले आहे, तिच्या जन्मामुळे दोघेही खूप आनंदी आहेत. हरमन बावेजा, साशा रामचंद्रानी किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हरमन बावेजा आणि साशा डिसेंबर 2022 मध्ये एका मुलाचे पालक झाले होते. TOI च्या रिपोर्टनुसार, वयाच्या 43 व्या वर्षी हरमन पुन्हा एकदा पिता बनला आहे. यावेळी त्यांना एक सुंदर मुलगी झाली आहे. पण अभिनेता किंवा त्याच्या कुटुंबाने कोणतीही पोस्ट किंवा फोटो शेअर करून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (हेही वाचा -The Great Indian Kapil Show: कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक, दोन्ही भावांच्या डोळ्यात आलं पाणी)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rowena Baweja (@rowenabaweja)

21 मार्च 2021 रोजी या जोडप्याचे लग्न झाले, ज्यात कुटुंब आणि मित्र उपस्थित होते. दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. इतर स्टार्सप्रमाणे हरमन बावेजाची कारकीर्द फार काळ टिकली नाही. त्याने 2008 मध्ये प्रियांका चोप्रासोबत 'लव्ह स्टोरी 2050'मधून पदार्पण केले. यानंतर तो 'विक्ट्री', 'व्हॉट्स युवर राशी', 'ढचकियां' आणि 'इट्स माय लाइफ'मध्ये दिसला. एवढेच नाही तर त्याने टीव्ही शो आणि वेब सीरिजमध्येही नशीब आजमावलं. मात्र त्याला यश मिळू शकले नाही.

करिश्मा तन्ना यांच्या 'स्कूप' या वेबसिरीजमध्ये अभिनेत्याने जेसीपी हर्षवर्धन श्रॉफची भूमिका केली होती. या भूमिकेतील हरमनच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. तसेच या मालिकेनेही बरीच चर्चा केली होती. अभिनेता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो.