The Great Indian Kapil Show: कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक, दोन्ही भावांच्या डोळ्यात आलं पाणी

नुकताच द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, सनी हा देओल कुटुंबाच्या यशाबद्दल सांगताना भावूक झाला आहे.

The Great Indian Kapil Show:  कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक, दोन्ही भावांच्या डोळ्यात आलं पाणी

2023 हे वर्ष देओल कुटुंबासाठी सफल होते. धर्मेंद्र (Dharmendra) यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) हा चित्रपट रिलीज झाला तर सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. सनीचा भाऊ बॉबीनं 'ॲनिमल' या ब्लॉकबस्टर चित्रपटात अबरार ही भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली. सनी आणि बॉबी यांनी द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो (The Great Indian Kapil Show) या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. कठीण काळाबद्दल आणि यशाबद्दल सांगताना सनी देओल भावूक झाला. त्यानंतर सनीचं बोलणं ऐकून बॉबी देखील भावूक झाला.

पाहा व्हिडिओ -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2024 05:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).