देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी भाजप (BJP) मधून शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला आहे. त्यावेळी सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) वडिलांच्या काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर तिची प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. तेव्हा सोनाक्षी हिने असे म्हटले होते की, भाजप मधून बाहेर पडल्यावर त्यांना काँग्रेस मध्ये अपमान सहन करावा लागणार नाही.
तर आता नुकत्याच एका मुलाखतीत सोनाक्षी हिला पुन्हा वडिलांसाठी निवडणुकीसाठी प्रचार करणार का असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सोनाक्षीने म्हटले की, माझा सिनेमा प्रदर्शित होतो तेव्हा शत्रुघ्न सिन्हा माझ्यासाठी प्रमोशन करत नाहीत. तर मी सुद्धा त्यांचा प्रचार का करावा? तसेच त्यांचीसुद्धा अशी इच्छा नाही असे सोनाक्षी हिने उत्तर दिले आहे.(हेही वाचा-काँग्रेस पक्षात शत्रुघ्न सिन्हा यांना अपमान सहन करावा लागणार नाही, सोनाक्षी सिन्हा हिची प्रतिक्रिया)
सोनाक्षी ही राजकरणापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. तसेच काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर वडिल आता कोणाच्या दबावाखाली काम करता उत्तम कामगिरी करुन दाखवतील अशी भुमिका सोनाक्षी हिने मीडियासमोर मांडली होती.