काँग्रेस पक्षात शत्रुघ्न सिन्हा यांना अपमान सहन करावा लागणार नाही, सोनाक्षी सिन्हा हिची प्रतिक्रिया
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (फोटो सौजन्य-ANI)

भाजप (BJP) पक्षानंतर आता काँग्रेस (Congress) पक्षात शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी नुकताच प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेस पक्षात वडिलांनी प्रवेश केल्याबद्दल सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिला विचारण्यात आले. त्यावेळी सोनाक्षी हिने मीडियाल उत्तर देत असे म्हटले की, शत्रुघ्न सिन्हा यांचा काँग्रेस पक्षात जाण्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तसेच एखादी व्यक्ती एका पक्षात नाखुश असेल्यास त्याने पक्ष बदल करण्यास काही हरकत नाही. तर काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर वडिल आता कोणाच्या दबावाखाली काम करता उत्तम कामगिरी करुन दाखवतील अशी भुमिका सोनाक्षी हिने मीडियासमोर मांडली.

एएनआयने (ANI) दिलेल्या वृत्तानुसार, एका कार्यक्रमाच्या दरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप सोडल्यावरुन सोनाक्षी हिला विचारण्यात आले. त्यावेळी तिने भाजप पक्षात राहून अपमान सहन करण्यापेक्षा पक्ष बदल केल्यास उत्तम असे म्हटले आहे. यावेळी जयप्रकाश नाराणायण, माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दल विधान करत त्यांच्या उपस्थितीत वडिलांना पक्षात कधीच आदराने वागवले नसल्याची खंत सोनाक्षी हिने केली. तर वडिलांनी भाजप पक्ष सोडण्याचा विचार खूप अगोदरच करायला हवा होता असे सुद्धा सोनाक्षी हिने म्हटले आहे.(हेही वाचा-'थँक्यू काँग्रेस, आमची डोकेदुखी तुमच्याकडे घेतल्याबद्दल'; शत्रुघ्न सिन्हा यांच्या भाजप सोडचिठ्ठीवर अरुण जेटली यांची टीका)

ANI ट्वीट:

तर भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर नव्याच्या नऊ दिवसाप्रमाणे त्यांचा आदर करण्यात आला. परंतु दिग्गज नेत्यांच्या उपस्थित वडिलांसोबत अशा पद्धतीचे वागणे चुकीचे आहे. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय आधी घ्यायला हवा होता.