Liger Teaser Release Postponed: तमिळ सुपरस्टार Vijay Deverkonda च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, COVID-19 मुळे लाइगर टीजरची रिलीज डेट पुढे ढकलली
Liger (Photo Credits: Instagram)

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट 'लाइगर' (Liger) च्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी... अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverkonda) याची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची टीजर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. कोविड-19 च्या संक्रमणामुले चित्रपट निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. कोविडचा धोका लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने या टीजरचा रिलीज प्लान पुढे ढकलण्यात आला आहे. विजयच्या या चित्रपटातील त्याच्या चाहत्यांना प्रतिक्षा होती. मात्र या बातमीने त्यांचा हिरमोड झाला आहे.

धर्मा प्रोडक्शनने याबाबतचे एक पत्रक जारी केले आहेत. ज्यात यामागचे कारण स्पष्ट करण्यात आले आहे.हेदेखील वाचा- Drishyam 2 ची शुटिंग सुरू होणार नाही; निर्मात्याने उच्च न्यायालयात दिलं 'हे' आश्वासन

'संपूर्ण देश खूप कठीण काळातून जात आहे. आमचा उद्देश समाजाची मदत करण्याचा आहे आणि याच कारणासाठी आम्ही लाइगरची टीजर रिलीज डेट पोस्टपोन केली आहे.' असे सांगण्यात येत आहे की, या चित्रपटात विजर देवकोंडा एक वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळणार आहे. असा अंदाज जो याआधी तुम्ही कधीही पाहिला नसेल.

लाइगर चित्रपटात विजयसह अनन्या पांडे, रम्या कृष्णन, रोनित रॉय, मकरंद देशपांडे आणि गेटअप श्रीनू लीड रोलमध्ये दिसणार आहेत.

धर्मा प्रोडक्शनने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात लोकांनी लवकरात लवकर कोरोनाचे डोस घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे. लाइगर हा चित्रपट तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मलयालम या भाषांमध्ये शूट करण्यात आला आहे. या चित्रपटात विजय बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.