अक्षय कुमार (Akshay Kumar) स्टारर चित्रपट 'लक्ष्मी' (Laxmii) सोमवारी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. तमिळ हॉरर कॉमेडी फिल्म कंचनाचा हा हिंदी रीमेक आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी याची बरीच चर्चा झाली होती. लोकांना आशा होती की हा चित्रपट त्यांचे मनोरंजन करेल मात्र ‘लक्ष्मी’ने प्रेक्षकांची घोर निराशा केली. प्रेक्षकांना हा चित्रपट अजिबात आवडला नसून त्याबाबत ट्विटरवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. परंतु चित्रपट रिलीज होण्यापूर्वी निर्मात्यांनी त्यातील एक पात्र लपवून ठेवले होते, यावर कधीच चर्चा झाली नव्हती. आता चित्रपटाच्या रिलीजनंतर या पात्राने खळबळ उडवून दिली आहे. ही व्यक्तिरेखा आहे चित्रपटामधील मूळ ‘लक्ष्मी’ व जी साकारली आहे अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar) याने.
महत्वाचे म्हणजे लोक अक्षय कुमारला डावलून शरद केळकरच्या अभिनयाचे व त्याच्या व्यक्तिरेखेचे कौतुक करत आहेत. पब्लिक रिव्ह्यू पहिला तर, लोकांना हा चित्रपट फारसा आवडला नाही, परंतु चित्रपटात 'लक्ष्मी' ची भूमिका साकारणारा शरद केळकर हिट ठरला आहे. शरद केळकरने या सिनेमात फारच छोटी, अवघी 15 ते 20 मिनिटांची भूमिका साकारली असेल, परंतु त्याने आपल्या कसदार अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. एकीकडे लोक अक्षय कुमारच्या अभिनयाला ओव्हर अॅक्टिंग म्हणत आहेत, तर दुसरीकडे ते शरद केळकरच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत.
Talk about Range @SharadK7
Same Year 🔥🔥🔥
If @akshaykumar
Was the heart of the film.. Then @SharadK7 is the soul the film ❤️❤️#Laxmii #LaxmiiReview #SharadKelkar pic.twitter.com/NC9w6R1al5
— Pake Jeralta (@abhiiiiiii_v) November 9, 2020
Just saw #LaxmiBomb @SharadK7 sir you are awesome!🔥
You did super, outstanding performance in Laxmi bomb ❤️ proud to have actors like you💯❤️🔥 #SharadKelkar 💀❤️
— Anushka Parab✨ (@Anushka0303) November 9, 2020
I am huge fan @akshaykumar Sir. But @SharadK7 is HERO in the film. Amazing performance and expressions. @sharadK7 When you cried, I also cried with you. Wish you luck and success. #Laxmii #AkshayKumar #SharadKelkar #SoulRefreshing pic.twitter.com/qJPmJ3zIH3
— Ashuttosh Kumar Jha (आशुतोष कुमार झा ) (@iashutoshmohit) November 9, 2020
Honestly speaking being @akshaykumar fan i can say @SharadK7 just steals the show with his 15 minutes cameo🔥. Overall a good watch. 🙏#Laxmii #LaxmiiReview pic.twitter.com/m7wXmtiAUx
— Anand Sathish (@anandashtakar) November 9, 2020
Performance of @SharadK7 was beyond imagination, you really deserve appreciation. #SharadKelkar#LaxmiiReview pic.twitter.com/803AVdlJ6q
— Abhishek (@m_avishekpathak) November 10, 2020
Bollywood sucks coz gem actors like #SharadKelkar get 15 mins roles despite proving mettle dat he can eat up sh***y wahiyad lead actors.Akshay Kumar's so terrible an actor dat evn terrible wl be ashamed. One can say he does good comedy.But we were kids den so we thought its good
— Quirky Naari (@QuirkyNaari) November 10, 2020
#SharadKelkar 18 min cameo better then all 2 hr 20 min film 👍
Bande ne kya zabardast emotion portray kiyaa #Laxmii mein👏👏@SharadK7 STAR HO BHAI AAP 🔥🔥 pic.twitter.com/3seFTrwIlA
— Raj #Radhe (@BeingRajuu) November 10, 2020
You still the show man..
Small role but very impact ful role,
First Tanhaji- The Unsung Warrior
And now Laxmi,
Completely overshadowed other cast... pic.twitter.com/zstyTMOtD2
— BEING MSD (@being_Mahi07) November 10, 2020
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शरद केळकर दाखवलेला नाही, तो एका सरप्राईज पॅकेजप्रमाणे चित्रपटा दिसला आहे. अभिनेत्याने पुन्हा सिद्ध केले की तो एक अंडररेटेड जेम असून, चित्रपटात मोठी स्क्रीन मिळणे गजरेचे आहे. शरद केळकर यापूर्वी 'तानाजी' चित्रपटात दिसला होता, ज्यात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.