शिकारा सिनेमाची स्क्रिनिंग पाहताना भावुक झाले लाल कृष्ण अडवाणी; विधू विनोद चोप्रा यांनी शेअर केला व्हिडीओ
Lal Krishna Advani Went Emotional During Screening Of Shikara (Photo Credits: Instagram/Vidhu Vinod Chopra)

काश्मिरी पंडितांच्या (Kashmiri Pandits) जीवनावर आधारित ‘चित्रपट शिकारा : द अनटोल्ड स्टोरी ऑफ कश्मीरी पंडित’ (Shikara)  शुक्रवारी 7  फेब्रुवारी रोजी देशभरात प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच समीक्षकांकडून या कथानकाविषयी विविध प्रतिक्रिया आल्या होत्या, अनेकांच्या मते या सिनेमात केवळ प्रेमकथा मांडून सत्यपरिस्थिती डावलली गेली असल्याचे सांगितले जात होते, तर काहींनी सिनेमावर स्तुतीसुमने उधळली होती. या संमिश्र प्रतिक्रिया समोर येत असतानाच भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांचा एकी व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. शिकारा सिनेमाच्या प्रदर्शनाच्या पूर्वी एक खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आली होती. या स्क्रिनिंगला अडवाणी सुद्धा उपस्थित होते, चित्रपट पाहिल्यावर ते भावुक झाले असताना या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांनी हा व्हिडीओ आपल्या इंस्टा अकाऊंट वरून शेअर केला आहे.

शिकारा हा चित्रपट पाहत असताना अडवाणींच्या डोळ्यात पाणी तरळल्याचं पाहायला मिळत आहे. काश्मिरी पंडितांसोबत जे झालं ते पाहून त्यांना अश्रु अनावर झाल्याचं सांगण्यात येत आहे. “लालकृष्ण अडवाणी यांनी शिकारा पाहिला. चित्रपटावर तुम्ही केलेलं प्रेम आणि दिलेले आशिर्वाद यासाठी मनापासून आभारी आहे”, असं कॅप्शन विधू विनोद चोप्रा यांनी या व्हिडीओखाली दिले आहे.

विधू विनोद चोप्रा पोस्ट

शिकारा या चित्रपटात काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार मांडण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या विरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून काश्मीरी मुस्लिम समुदायाबाबत सिनेमा वाईट गोष्टी पसरवत असल्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे स्थानिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याने चित्रपट प्रदर्शित होण्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.