संपूर्ण जगभरात हाहाकार घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रभाव भारतावरही वाढत आहे. सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या यामुळे लॉकडाऊनचा चौथा टप्पा भारतवासीय अनुभवत आहेत. देशाभरातील लाखाहून अधिक नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यात गरिब, समान्य ते अगदी सेलिब्रिटींचाही समावेश आहे. हॉलिवूड सेलिब्रिटी टॉम हॅन्क्स, इद्रीस एल्बा, सीन पेन यांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र ते त्यातून बरे झाले. तर बॉलिवूडमध्येही कोविड 19 ने शिरकाव केला आणि सर्वप्रथम गायिका कनिका कपूर (Kanika Kapoor) कोविड 19 पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता अभिनेता किरण कुमार (Kiran Kumar) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून ते क्वारंटाईनमध्ये आहेत.
कनिका कपूर, किरण कुमार यांच्यासह अजून काही बॉलिवूड सेलिब्रिटींना कोविड 19 चा संसर्ग झाला आहे. करीम मोरानी (Karim Morani), ज़ोआ मोरानी (Zoa Morani), पूरब कोहली (Purab Kohli) यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान बोनी कपूर यांच्या घरातील 3 नोकर कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर बोनी कपूर, जान्हवी-खुशी कपूर यांचीही चाचणी करण्यात आली. परंतु, ते तिघेही कोरोना निगेटीव्ह असल्याचे रिपोर्ट्समधून समोर आले.
किरण कुमार:
View this post on Instagram
Actor Kiran Kumar diagnosed with Covid 19. Pray for his good health. #Bollywood #actor #kirankumar
कनिका कपूर:
करीम मोरानी:
जोया मोरानी:
पूरब कोहली:
देशातील सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्र राज्यात आहेत. विशेषतः मुंबईतील कोविड 19 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.