अभिनेत्री होण्यापूर्वी कियारा अडवाणी 'या' ठिकाणी करायची नोकरी
कियारा अडवाणी (Photo Credits-Twitter)

अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) ही सध्या बी-डाऊनमध्ये फारच चर्चेत आहे. अभिनेता शाहीद कपूर याच्यासोबत 'कबीर सिंग' चित्रपटातून झळकल्यानंतर तिच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. तर कियारा लवकरच 'गुज न्यूज' या नव्या चित्रपटातून सुद्धा दिसून येणार आहे. यापूर्वी कलंक चित्रपटातून वरुण धवन सोबत 'फर्स्ट क्लास' या गाण्यातून थिरकताना दिसली होती. मात्र आता आगामी सिनेमा येण्यापूर्वी कियारा हिने तिच्या अभिनेत्री होण्यापर्यंतच्या प्रवासाचे काही किस्से सांगितले आहेत.

कियारा हिने एका मुलाखतीत अभिनेत्री होण्यापूर्वीचा तिचा प्रवास सांगितला आहे. त्यावेळी कियारा हिने असे म्हटले आहे की, अभिनेत्री होण्यापूर्वी मी तिच्या आईच्या बालवाडीत काम करत होती. त्यावेळी कियारा अन्य शिक्षकांप्रमाणेच शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मौजमजा आणि त्यांना थोडेफार शिकवत ही असे. रिपोर्ट्स नुसार कियारा हिला लहान मुले फार आवडतात. एवढेच नाही तर स्वत:चे मुल असेल त्यावेळी मी अत्यंत आनंद व्यक्त करीन असे ही कियारा हिने म्हटले आहे.(Good Newwz Poster: दोन गर्भवती महिलांमध्ये फसलेल्या अक्षय कुमार आणि दिलजीत दौसांझ याच्याकडे 'गुड न्यूज'?)

गुड न्यूज या चित्रपटाला गुफ-अप-ऑफ-द इयर असा टॅग दिला आहे. हा चित्रपट क्रिसमसच्या वेळी म्हणजेच 27 डिसेंबरला प्रेक्षकांना पहाता येणार आहे. या चित्रपटाचे रिलिज करण्यात आले होते. त्यामध्ये करिना कपूर आणि कियारा अडवाणी बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आल्या होत्या. तसेच या चित्रपटात अक्षय कुमार आणि दिलजीत दोसांझ सुद्धा मुख्य भुमिकेतून झळकणार आहेत.