Kashmera Shah (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री कश्मिरा शाह (Kashmera Shah) सरोगसीद्वारे दोन जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर बराच काळापासून रुपेरी दुनियेपासून लांब होता. मात्र अलीकडेच तिने ट्रान्सफॉर्मेशन केले असून बिकिनीतील एक हॉट फोटोशूट (Hot Photoshoot) केले आहे. तिच्यात झालेला हा बदल पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. अलीकडे तिने हे फोटोशूट सोशल मिडियावर शेअर करून आपण 10 किलो वजन कमी केल्याची माहिती चाहत्यांना दिली. तिचा हा ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. किंबहुना तिचे चाहते तिला असं पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक होते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या सिल्व्हर रंगाच्या ड्रेसमधील तिचे फोटोशूट प्रचंड चर्चेत आहे.

कश्मिरा शाह एका स्विमिंग पूल जवळ सिल्व्हर रंगाच्या ड्रेस मध्ये हे फोटोशूट करत आहे. आपली बॉडी फ्लाँट करत तिने हे हटके फोटोशूट केले आहे.हेदेखील वाचा- Govinda-Krushna Abhishek Controversy: भाचा कृष्णा अभिषेक च्या विधानावर आता मामा गोविंदा ने ही सोडले मौन, म्हणाला सत्य सर्वांसमोर आलेच पाहिजे

 

View this post on Instagram

 

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

या फोटोखाली तिने तुमच्यातील दोन गोष्टी तुमचे निरीक्षण करत असतात एक म्हणजे तुमची सहनशक्ती जेव्हा तुमच्याकडे काही नसते आणि दुसरी तुमचा अॅटिट्यूड जेव्हा तुमच्याकडे सर्वकाही असते असे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

या फोटोशूटच्या एका व्हिडिओखाली तिने म्हटले आहे की, एखादी गोष्ट तोपर्यंतच अशक्य आहे जोपर्यंत ती पूर्ण होत नाही. कश्मिराचा हा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज तिचे चाहते प्रचंड पसंत करत आहे.

दरम्यान तिचा आणि तिच्या नव-याचा कृष्णा अभिषेकचा मामा गोविंदा आणि त्याची पत्नी यातील वाद देखील चांगलाच पेटला आहे. यात कश्मिरावरही गोविंदाने बरेच आरोप केले आहेत.