Kartik Aaryan ला बनायच आहे Food Blogger; अभिनेत्याने पोस्टमध्ये व्यक्त केली इच्छा
Kartik Aaryan (PC - Instagram)

Kartik Aaryan Wants To Become a Food Blogger: बॉलिवूडचा हँडसम हंक कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या त्याच्या 'चंदू चॅम्पियन' चित्रपटामुळे चर्चेत आहे. याशिवाय, अभिनेता त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीचं चाहत्यांमध्ये चर्चेत राहतो. आता कार्तिक पुन्हा एकदा त्याच्या ताज्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे. अलीकडेच कार्तिकने त्याच्या इंस्टाग्रावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्याने अभिनय सोडून फूड ब्लॉगर (Food Blogger) बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता अभिनेत्याची ही पोस्ट पाहून चाहते त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

कार्तिकला बनायच आहे फूड ब्लॉगर -

नुकताच कार्तिक आर्यन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयोजित केलेल्या WPL 2024 च्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करण्यासाठी बंगळुरूला पोहोचला आहे. या कार्यक्रमानंतर कार्तिक शहरात पिकनिकला गेला आणि तेथील प्रसिद्ध खाद्यपदार्थ चाखताना दिसला. (हेही वाचा -Kartik Aaryan ला भेटण्यासाठी चाहत्याने सायकलवरून केला 1100 किलोमीटरचा प्रवास, Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिकने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर यादरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. कार्तिक तिथल्या खाद्यपदार्थाने इतका प्रभावित झाला की, त्याने आपल्याला फूड ब्लॉगर व्हायचं असल्याची इच्छा व्यक्त केली. ही छायाचित्रे शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'बंगलोरमधील हे स्वादिष्ट आणि प्रसिद्ध रेस्टॉरंट्स पाहिल्यानंतर मी फूड ब्लॉगर बनण्याचा विचार करत आहे.' कार्तिकची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कार्तिक आर्यनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अभिनेता 'सत्यप्रेम की कथा' मध्ये दिसला होता. 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटात कार्तिक भारतीय लष्करातील जवानाची भूमिका साकारताना दिसणार आहे.