बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन एका चित्रपटासाठी घेणार 'इतकी' रक्कम
Karthik Aryan (PC - Instagram)

बालिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने (Karthik Aryan) आपली फीस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता कार्तिक एका चित्रपटासाठी 7 कोटी रुपये घेणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे. कार्तिकने अगदी कमी वेळेत बालिवूड सिनेसृष्टीत आपलं स्थान भक्कम केलं. त्याने 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर कार्तिकने दमदार भूमिका करत प्रेक्षकांची मने जिंकली. सध्या तो 'भूल भुलैया 2' आणि 'लव्ह आजकल 2' या चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच येत्या 6 डिसेंबरला त्याचा 'पति, पत्नी और वो' प्रदर्शित होणार आहे. (हेही वाचा - सारा अली खान हिच्या Ex-Boyfriend च्या भावासोबत जान्हवी कपूरचे होते प्रेमसंबंध?)

कार्तिकचे काम पाहता त्याला 7 कोटी मानधन देण्यासाठी दिग्दर्शक फारसा विचार करणार नाही. त्यामुळे या आत्मविश्वासाने कार्तिकने फीस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कार्तिकला 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटात चांगलचं यश मिळालं होतं.

हेही वाचा - Luka Chuppi Trailer: पहा काय घडते जेव्हा कार्तिक आर्यन आणि क्रिति सेनन यांच्या लिव्हइनमध्ये सामील होते त्यांचे कुटुंब

दरम्यान, बॉलिवूडचं क्यूट कपल सारा अली खान आणि कार्तिक आर्यन नेहमीच त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत असतात. परंतु, सारा आणि कार्तिकचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सिनेसृष्टीत रंगल्या होत्या. दोघंही सतत आपापल्या कामात बीझी असल्यानं एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तरी हे दोघंही आपापल्या प्रोफेशनल लाइफवर लक्ष देण्याचा प्रयत्न करत आहेत.