सारा अली खान हिच्या Ex-Boyfriend च्या भावासोबत जान्हवी कपूरचे होते प्रेमसंबंध?
जान्हवी कपूर (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

बॉलिवूडमध्ये सध्या सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) या दोघींबद्दल खूप चर्चा रंगू लागल्या आहेत. गेल्या वर्षीय या दोन्ही स्टारकिडने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आपल्या सिनेसृष्टीची सुरुवात केली आहे. जान्हवी कपूर ही जुलै 2018 रोजी करण जौहर याचा चित्रपट 'धडक' या चित्रपटातून झळकली होती. तर सारा अली खान ही सुशांत सिंग राजपूत सोबतचा चित्रपट 'केदारनाथ' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

सारा आणि जान्हवी या दोघी सध्या लाईम लाईटमध्ये येत असून या दोघींच्या रिलेशनशिप्सबद्दल मीडियात खूप चर्चा सुरु आहे. नुकताच साराने तिच्या पूर्वीच्या रिलेशनशिप्सबद्दल उघडपणे एका मुलाखती दरम्यान सांगितले होते. त्यावेळी एका राजकीय नेत्याच्या नातवाला तिने डेट केल्याचा खुलासा केला. (हेही वाचा-सुशील कुमार शिंदे यांच्या नातवासोबत सारा अली खानला झाला होता इश्क; नाजूक टप्प्यावर नात्याला पूर्णविराम)

त्यानंतर आता या प्रकरणी जान्हवी कपूर हिचे सुद्धा नाव रिलेशनशिप्सबाबत पुढे आले आहे. जान्हवीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे (Sushil Kumar Shinde)  यांच्या नातवाला डेट करत होती. परंतु शिंदे यांचा नातु वीर नसून त्याच्या छोटा भाऊ शिखर पाहाडिया (Shikhar Pahariya) याला ती डेट करत असल्याचे समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, श्रीदेवी यांनी जान्हवी आणि शिखर या दोघांच्या मैत्रीसंबंधाशी सहमत नव्हती. त्यामुळे श्रीदेवी हिने जान्हवीला शिखर सोबतचे संबंध तोडून टाकण्यास सांगितले होते. तसेच एका पार्टीदरम्यान जान्हवी आणि शिखर यांचे किसिंग फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.