Prithviraj: अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' चित्रपटावर बंदी घालण्याची करणी सेनेची मागणी
Prithviraj (Photo Credit - Insta)

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) यांच्या आगामी 'पृथ्वीराज' (Prithviraj) चित्रपटाबाबतचा वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. जिथे अक्षय आणि मानुषीचे चाहते 'पृथ्वीराज' चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचवेळी करणी सेना (Karni Sena) चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीवर ठाम आहे. हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. करणी सेनेने ही जनहित याचिका दाखल केली होती, त्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) लखनौ खंडपीठाने केंद्र सरकारला (Central Government) प्रश्न विचारला आहे. पृथ्वीराज या चित्रपटाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने केंद्र सरकारला विचारले की, पृथ्वीराज चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिले आहे का? करणी सेनेच्या उपाध्यक्षा संगीता सिंह यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती एआर मसूदी आणि न्यायमूर्ती एनके जोहरी यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

चित्रपटावर बंदी घालावी अशी करणी सेनेची मागणी

या चित्रपटावर बंदी घालण्याची करणी सेनेची मागणी आहे. चित्रपटात पृथ्वीराज यांची चुकीची प्रतिमा दाखवली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील. याचिकाकर्त्यांचे असेही म्हणणे आहे की चित्रपटाच्या प्रिव्ह्यूवरून हे दिसून येते की तो वादग्रस्त असेल.

करणी सेनेच्या निशाण्यावर बॉलिवूडच!

करणी सेना अशा चित्रपटाला विरोध करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही बॉलिवूड चित्रपटाला करणी सेनेने विरोध केला आहे. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर स्टारर 'पद्मावत' या चित्रपटाचाही करणी सेनेने जोरदार विरोध केला होता. हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केला होता आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी करणी सेनेने प्रत्येक चित्रपटगृहाबाहेर प्रदर्शन केले होते. (हे ही वाचा Gangubai Kathiawadi Trailer: आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, आलियाचा जबरदस्त अंदाज)

चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले चित्रपटाचे दिग्दर्शन 

'पृथ्वीराज' चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. यशराज बॅनरखाली बनलेला हा चित्रपट 21 जानेवारीला रिलीज होणार होता, पण कोरोनाच्या परिस्थितीमुळे तो होऊ शकला नाही, तो कधी रिलीज होणार हे सध्या तरी ठरलेले नाही.