बॉलीवूडवर एकेकाळी राज्य करणारी अदाकारा करिश्मा कपूर (Karisma Kapoor), गेली अनेक वर्षे आपल्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्थ होती. घटस्फोटानंतर ती परत मुंबईत येऊन राहू लागली, मात्र इतक्या वर्षांच्या ब्रेक नंतर तिला कामे मिळणे अवघड झाले होते. अखेर करिष्मा कपूरला पुनरागमनाची संधी मिळाली आहे. मात्र चित्रपट नाही, तर एका वेबसिरीजद्वारे पुन्हा एकदा करिष्माचा अभिनय पाहण्याची संधी मिळणार आहे.
ALTBalaji आणि zee5 यांच्या बहुप्रतिक्षित वेब-मालिका 'मेंटलहुड' (Mentalhood) मध्ये करिश्मा कपूर दिसणार आहे. नुकताच या सीरीजचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे.
मेंटलहुड टीझर -
बॉलिवूडची लोलो ऊर्फ करिश्मा कपूर या सीरीजद्वारे तिचा डिजिटल डेब्यू करत आहे. मेंटलहुड या वेब सीरिजचा टीझर रिलीज झाला आहे आणि खरोखर तो एका रोलरकास्टर राइडसारखा आहे जो आपण मिस करू शकत नाही. ही मालिका अल्ट बालाजी आणि जी 5 वर मार्चपासून पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. मातृत्वाच्या वेगवेगळ्या छटा दाखवणाऱ्या या सीरीजमध्ये करिश्मा कपूर, मीरा शर्मा, मिस कानपूर या भूमिकेत दिसणार आहे. तीन लहान मुलांच्या आईची भूमिका ती साकारत आहे. शोच्या टीझरमध्ये करिश्मासोबत डिनो मोरिया, संजय सूरी, संध्या मृदुल, शिल्पा शुक्ला, श्रुति सेठ आणि तिलोतमा शोम यांच्या मुख्य भूमिका आहेत. (हेही वाचा: अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांच्या दडलेल्या मैत्रीचा उलगडा करणारा एबी आणि सीडी चा टिजर नक्की पाहा, Watch Video)
एकता कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर मेंटलहुडचा टीझर शेअर केला आहे. टीझर पाहून असे दिसते की, ही कहाणी मातृत्वामुळे त्रस्त असणाऱ्या विविध प्रकारच्या महिलांवर आधारित आहे. आया आपली घरातील जबाबदाऱ्या सांभाळून मुलांचे संगोपन कशा प्रकारे करतात ते यामध्य दिसून येणार आहे.